अवघ्या सात तासांत ‘चेन स्नॅचर्स’ जेरबंद

By admin | Published: July 12, 2017 12:07 AM2017-07-12T00:07:51+5:302017-07-12T00:07:51+5:30

सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन युवकांना सात तासांच्या आत कोतवाली पोलिसांनी शोधून काढले.

Just seven hours 'chain snatches' Martingale | अवघ्या सात तासांत ‘चेन स्नॅचर्स’ जेरबंद

अवघ्या सात तासांत ‘चेन स्नॅचर्स’ जेरबंद

Next

कोतवाली पोलिसांची कारवाई : डफरीन रुग्णालय मार्गावरील घटना
अमरावती : सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन युवकांना सात तासांच्या आत कोतवाली पोलिसांनी शोधून काढले. सोमवारी रात्री ११.३०च्या सुमारास जिल्हा स्त्री रूग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. नीलेश ऊर्फ गोलू गजानन दुधरकर (१८,रा.अंबाविहार) व एका अल्पवयीनाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
केवल कॉलनीजवळील अनंत विहार येथील रहिवासी पकंज दिगंबर दखणे हे सोमवारी रात्री काही कामानिमित्त गोपालनगरकडे जात होते. दरम्यान गाडगेनगर उड्डाणपूलावर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव दुचाकीने ओव्हरटेक करून कट मारला. पंकजने त्या दुचाकीस्वाराला हटकले असता त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे पंकजने त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सदर दुचाकीस्वार पळून गेला. पंकजने त्याचा इर्विन चौकापर्यंत पाठलाग केला. मात्र, तो दिसून आला नाही. त्यामुळे पंकज पुन्हा दुचाकीने गोपालनगरकडे निघाले.
इर्विन चौकातून राजापेठ उड्डाणपुलावर चढण्याआधीच पंकजजवळ एक दुचाकी येऊन थांबली. त्यावरील दोन युवकांनी ओव्हरटेक करणारा दुचाकीस्वार डफरीनकडे पळाल्याचे पंकजला सांगितले. पंकज यांनी डफरीनच्या दिशेने दुचाकी वळवली. मागोमाग सदर दुचाकीस्वारही निघाले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पंकजच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. झालेल्या झटापटीत पकंजच्या अंगठ्याला दुखापत सुद्धा झाली. सदर अज्ञात युवक उड्डाणपुलावरून पळून गेली. पंकजने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीचा क्रमांक लिहून घेतला. त्यानंतर पंकजने कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवून चौकशी सुरु केली.

पोलिसांनी वेगाने हलविली सूत्रे
पंकज दखने यांनी दिलेल्या दुचाकी क्रमाकांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता विनोद चिखलकर नावाच्या चार व्यक्तींची नावे पुढे आली. पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी यानावाच्या व्यक्तिंच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्यांचा याघटनेशी संबंध आहे किंवा नाही, याची शहानिशा केली. त्यापैकी तिघांचा या घटनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी सकाळी आरटीओ कार्यालयामार्फत दुचाकी क्रमांक ट्रेस करून पोलिसांनी विनोद चिखलकरचा पत्ता शोधून त्याला अटक केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सात तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आले.

Web Title: Just seven hours 'chain snatches' Martingale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.