सर्वसामान्यांना न्याय हेच माझ्या राजकारणाचे ध्येय
By admin | Published: October 12, 2014 11:28 PM2014-10-12T23:28:49+5:302014-10-12T23:28:49+5:30
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून युवकांच्या हाताला रोजगार देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी यासाठी ही निवडणूक लढवीत असून
सुरेखाताई ठाकरे : बेरोजगारांना रोजगार, मतदारसंघाचा विकास
चांदूरबाजार : मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून युवकांच्या हाताला रोजगार देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी यासाठी ही निवडणूक लढवीत असून समाजकारणाचे बाळकडू आपल्याला बालपणापासूच मिळाल्याचे शिवसेनेच्या अचलपूर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सुरेखाताई ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहून केलेल्या कामांचा अनुभव मंत्रालयातील कामे करण्यास सोईचे होणार आहे. तो अनुभव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासकामासाठी वापरणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या भागासाठी भरपूर विकास निधी खेचून आणला. रस्ते, समाज मंदिर व धार्मिक तीर्थक्षेत्रासाठी तो वापरण्यात आला आहे. या भागात विकासकामे केल्यामुळे अनेक परिवार माझ्याशी जुळले आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास व प्रेमाचे आशीर्वाद असून तेच आपल्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
राजकारणाचे धडे मला बालपणापासूनच मिळाले आहे. माझे वडील आमदार होते. त्यांच्या मार्गदर्शनात समाजसेवेचे व राजकारणाचे धडे घेतले. शासन दरबारातून विकासाठी निधी कसा आणावा याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण विकासासाठी शासनाचा निधी आवश्यक असते. याची मला कल्पना आहे. समाजातील प्रत्येक घटकातील शेवटच्या व्यक्तीचा विकास कसा करता येईल याकडे माझे नेहमी लक्ष असते. एका मोठ्या घरची सून जरी असली तरी माझी प्रेमाची नाळ या भागातील मातीशी जुळली आहे. मी शेतकरी असल्याने त्यांच्या दु:खाची मला जाणीव आहे. या भागात अनेक समस्या आजही कायम आहेत. त्या समस्या कशा दूर करता येईल यासाठी मी प्रयत्नशील असते. बहिरम यात्रेला सुसंस्कृत व धार्मिक यात्रेला महायात्रेचे स्वरुप देऊन संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळविला असल्याचे सुरेखाताई ठाकरे यांनी शेवटी सांगितले.