पुतण्याच्या हत्येप्रकरणी काकाला जन्मठेप
By admin | Published: January 23, 2015 12:40 AM2015-01-23T00:40:57+5:302015-01-23T00:40:57+5:30
पुतण्याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवीत न्यायालयाने आरोपी काकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
तळेगाव दशासर : पुतण्याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवीत न्यायालयाने आरोपी काकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अमरावती येथील जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक २ एस. एस. दास यांच्या न्यायालयाने मंगळवार २० जानेवारी रोजी हा निकाल दिला.
तळेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत धामक येथील लक्ष्मण आकाराम इंगोले (५५) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. लक्ष्मणने ४ फेब्रुवारी २०१२ रोजी शेतीच्या पैशाच्या वादातून पुतण्या सुधाकर जयराम इंगोले (४५, रा. धामक) याची हत्या केली होती. पैशाच्या हिस्सेवाटणीवरून लक्ष्मण व सुधाकर यांचेमध्ये वाद होऊन सुधाकरची हत्या झाली. प्रथम सुधाकरने लक्ष्मणला काठीने मारहाण केली त्यानंतर लक्ष्मण घरी गेला आणि विळा आणून त्याने सुधाकरवर आठ वार केले. डॉक्टरांनी सुधाकरला मृत घोषित केले. तळेगाव पोलिसांनी ५ फेब्रुवारी २०१२ ला लक्ष्मणला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. ५ साक्षीदार फितूर झाले. साथीदारांचे बयाण आणि पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने सुधाकरच्या हत्येप्रकरणी लक्ष्मणला दोषी ठरवित त्याला २० जानेवारी रोजी न्यायमूर्ती दास शेषन कोटाने आरोपीविरुद्ध निकाल दिला की कलम ३०२ भादंविमध्ये जन्मठेप व ५००० दंड तसेच कलम ३०७ भादंविमध्ये पाच वर्षे कैद व ३००० रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून देशमुख यांनी तर आरोपीची बाजू मिश्रा यांनी मांडली.