पोस्टमार्टेम न करता काळविटाचा दफनविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:34 PM2017-11-21T23:34:59+5:302017-11-21T23:35:26+5:30

परतवाडा वनवर्तुळ अंतर्गत चौसाळा शिवारात एक काळवीट रविवारी मृतावस्थेत आढळले. संबंधित वनाधिकाऱ्यांनी त्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत पोस्टमार्टेम न करता दफनविधी उरकल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

Kalvita's funeral without postmortem | पोस्टमार्टेम न करता काळविटाचा दफनविधी

पोस्टमार्टेम न करता काळविटाचा दफनविधी

googlenewsNext
ठळक मुद्देपरतवाडा सर्कलमधील घटना : पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमत
अमरावती : परतवाडा वनवर्तुळ अंतर्गत चौसाळा शिवारात एक काळवीट रविवारी मृतावस्थेत आढळले. संबंधित वनाधिकाऱ्यांनी त्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत पोस्टमार्टेम न करता दफनविधी उरकल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. त्यामुळे काळवीटाचा मृत्यू कशामुळे झाला, हे गुलदस्त्यात आहे.
वन्यजिवांच्या वर्गवारी-१ मध्ये असलेले काळवीट चौसाळा शिवारात मृतावस्थेत आढळले. वर्गवारी-१ मधील वन्यजिवाचा संशयास्पद अथवा शिकारीने मृत्यू झाल्यास शासकीय पशुवैद्यकीय अधिकाºयांमार्फत शवविच्छेदन केल्यानंतर दफनविधी व्हावा, अशी नियमावली आहे. हे काळवीट एका कापसाच्या शेतात मृतावस्थेत आढळले. त्याची शिकार झाली की विषबाधा, हे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनाही कळू शक ले नाही. वन्यजिवांच्या वर्गवारी वाघ, बिबट इतकेच काळवीट या प्राण्याला महत्त्व आहे. कापसाचा शेतात काळवीट आले की त्याला कोणी मारल्यानंतर आणून टाकले, या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. मात्र, काळवीट ज्या स्थितीत मृत निदर्शनास आले, त्यानुसार त्याचा मृत्यू विषबाधेने झाला असावा, असा कयास बांधला जात आहे. याप्रकरणी अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत, हे विशेष.
दफनविधीसाठी कुणाचे आदेश?
चौसाळा शिवार हे दर्यापूर वनक्षेत्रांतर्गत गणले जाते. त्यामुळे कापसाच्या शेतात मृतावस्थेत काळवीट आढळल्यानंतर त्याचे वैद्यकीय परीक्षण होणे ही नियमावली आहे. मात्र, दर्यापूर वनपालांनी परस्पर काळविटाची विल्हेवाट लावल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. वनपालांना दफनविधीसाठी कोणी आदेश दिलेत, याची चौकशी केल्यास वास्तव समोर येईल, असे वनविभागात बोलले जात आहे.

Web Title: Kalvita's funeral without postmortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.