गारपीटीमुळे मेळघाट बनलंय काश्मीर, सिमला, कुलू-मनालीची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 07:27 PM2021-02-18T19:27:46+5:302021-02-18T19:28:42+5:30
खंडूखेड्याच्या पुढे काटकुंभ चुरणी परिसरात केवळ जोराचा पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह वारावादळ झाल्यामुळे शेती पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाटातील खंडूखेडा परिसरात झालेल्या गारपिटीने सिमला, कुलू-मनालीची आठवण झाली. चिखलदरा तालुक्यातील अतीदुर्गम भागातील या खंडूखेड्यासह चुनखडी, घाना, भुतरुम, बिच्छूखेडा, परिसरात गुरुवार, १८ फेब्रुवारीला दुपारनंतर धुंवाधार गारपीट झाली.
घनदाट जंगलात, उंचउंच सागवान झाडीत या गारपिटीने सर्वत्र बर्फसदृश्य चादर पसरली होती. मोठ्या प्रमाणात वादळी वाऊसही झाला.
खंडूखेड्याच्या पुढे काटकुंभ चुरणी परिसरात केवळ जोराचा पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह वारावादळ झाल्यामुळे शेती पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच परिसरात वीज पडून एक बैलही ठार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. खंडूखेड्यासह लगतच्या परिसरात गारपीट झाली आहे. दुर्गम भागातील दोन खेड्याची माहिती मिळाली आहे. अधिक माहिती घेतली जात आहे.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा