स्टेट बँकेच्या पुढ्यात खुपसली 'कट्यार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:49 PM2018-06-12T23:49:50+5:302018-06-12T23:49:58+5:30
मोझरी परिसरातील पेट्रोल पंपवर मध्यरात्री दरोडा, तिवसा शहरात पोलिसांच्या घरात घरफोडी अशा घटनांनी तिवसा तालुका हादरला असताना, मंगळवारी सकाळी भारतीय स्टेट बँकेच्या पुढ्यात ‘कट्यार’ खुपसलेली आढळून आली. त्यामुळे आधीच रामभरोसे असणाऱ्या सुरक्षेबाबत गावकºयांच्या मनात भीतीचे सावट उमटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज (मोझरी) : मोझरी परिसरातील पेट्रोल पंपवर मध्यरात्री दरोडा, तिवसा शहरात पोलिसांच्या घरात घरफोडी अशा घटनांनी तिवसा तालुका हादरला असताना, मंगळवारी सकाळी भारतीय स्टेट बँकेच्या पुढ्यात ‘कट्यार’ खुपसलेली आढळून आली. त्यामुळे आधीच रामभरोसे असणाऱ्या सुरक्षेबाबत गावकºयांच्या मनात भीतीचे सावट उमटले आहे.
भारतीय स्टेट बँकेची गुरुकुंजाची शाखा महामार्गालगत असून, एकदा कुख्यात चोरट्यांनी या बँकेला लक्ष्य केले आहे. तिवसा तालुक्यातील मागील काही दिवसांतील घटनाक्रम बघता, येथील सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. चक्क पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी हात साफ करून हा मुद्दा ऐरणीवर आणला. कधीकाळी गुरुकुंजातील पोलीस चौकीवर आठ गावांच्या सुरक्षेसाठी चार कर्मचारी तैनात राहायचे. रात्रीच्या वेळी पोलीस वाहनाने गस्त घातली जायची. पण, कालांतराने कर्मचारी कपात केली गेली. त्यासाठी राहण्याची गैरसोय, कर्मचाºयांचा तुटवडा आदी कारणे दिली गेली. मोझरी विकास आराखड्यात आता चौकीची इमारत उत्तम उभारली आहे . फक्त आवश्यकता आहे २४ तास कामावर तैनात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाºयांची.
गुरुकुंज मोझरीपासून हाकेच्या अंतरावरील मोरे पेट्रोल पंपवर दरोडा पडला आणि पाठोपाठ तिवसा शहरात तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. त्यातच गुरुकुंजातील भारतीय स्टेट बँकेच्या पुढ्यात कट्यार खुपसली असल्याचे आढळले. याच परिसरात मोठ्या संख्येने डॉक्टर होऊ पाहणारे बीएएमएस अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वातव्यास राहतात. या मित्र-मैत्रिणींचा घोळका याच परिसरात रात्रीच्या अंधारात अनेकदा नागरिकांच्या निदर्शनास येतो. त्याचा या कट्यारशी काही संबंध आहे का, या चर्चेला उधाण आले आहे.
तक्रार नाही...: जमिनीत खुपसून ठेवलेली कट्यार बँक उघडण्याच्या सुमारास तेथे नव्हती. त्यामुळे या बाबीची माहिती घेतल्यानंतर तक्रार देऊ, असे बँकेतर्फे याप्रकरणी कळविण्यात आले.