कौंडण्यपूर, माताखिडकीला ‘ब’ दर्जासाठी प्रस्ताव देण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:35+5:302021-07-10T04:10:35+5:30

अमरावती : महानुभाव पंथाची काशी श्रीक्षेत्र रिध्दपूरचा जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात समावेश करून कामांना सुरुवात करावी. ...

Kaundanyapur, Matakhidki directed to propose for ‘B’ grade | कौंडण्यपूर, माताखिडकीला ‘ब’ दर्जासाठी प्रस्ताव देण्याचे निर्देश

कौंडण्यपूर, माताखिडकीला ‘ब’ दर्जासाठी प्रस्ताव देण्याचे निर्देश

Next

अमरावती : महानुभाव पंथाची काशी श्रीक्षेत्र रिध्दपूरचा जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात समावेश करून कामांना सुरुवात करावी. कौंडण्यपूर आणि अमरावती शहरातील माताखिडकी देवस्थानाला ‘ब’वर्ग दर्जा मिळावा, यासाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.

जिल्ह्याची पर्यटन विकास आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. वरूड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, उपायुक्त किरण जोशी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पर्यटन विकास महामंडळाचे विवेकानंद काळकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, कार्यकारी अभियंता शरद थोटांगे, विभावरी वैद्य आदी उपस्थित होते.

रिध्दपूर येथे पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांचा प्रस्तावात प्राधान्याने समावेश असावा. ज्यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, स्मशानभूमी, कब्रस्तान, अत्याधुनिक बसस्थानक, कवायतींची मैदाने, ग्रंथालये, रस्ते यांचा समावेश असावा. रिध्दपूर येथील थिम पार्क, विद्युत रोषणाई, बहुउद्देशीय सभागृहाची निर्मिती इत्यादी सर्व विकासकामांसाठी २२ कोटी ३२ लक्ष निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अंदाजे १० कोटी निधीतून प्रसाधन गृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्मितीची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ठाकूर यांनी दिले. धाबेरी, पाळा, माताखिडकी, काटसूर आणि मातृग्राम या स्थळांचा रिध्दपूर प्रस्तावात समावेश करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स

सासु-सुनेच्या विहिरीचे सौंदर्यीकरण

याच परिसरात सासु-सुनेची विहीर हे प्रसिध्द स्थळ आहे. महानुभाव पंथात आख्यायिका लाभलेल्या या विहिरीचे जतन करण्याच्या उद्देशाने या विहिरीची देखभाल व आसपासच्या परिसराचे सौंदर्यीकरण व विहिरीकडील प्रवेशद्वार सुशोभित करण्यात यावे, असे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले. सालबर्डी, अंबाडा, गव्हाणकुंड, बेडापूर क्षेत्र विकसित करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

बॉक्स

शेंडगाव आराखड्यातील कामे पूर्ण करा

संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ शेंडगावचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी १८.६३ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तेथे गाडगेबाबांचे जीवनपट उलगडणारे कलादालन, ग्रामसफाई अभियान प्रशिक्षण केंद्र आदीचे नियोजन करण्यात आले आहे. गाडगेबाबांचे जन्मगाव शेंडगाव व कर्मभूमी आमला या येथील कामांची सांगड घालून ही स्थळे विकसित करावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.

Web Title: Kaundanyapur, Matakhidki directed to propose for ‘B’ grade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.