कुहृयात पंढरीच्या वारकऱ्यांचा मेळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:05 PM2018-11-23T22:05:12+5:302018-11-23T22:05:43+5:30
कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला रुक्मिणीच्या माहेरी दहीहंडीसाठी वारकऱ्यांचा मेळा असतो. त्याच्या एक दिवस आधी तेथून दहा किलोमीटरवरील कुऱ्हा येथे तिवसा रोडवरील खुल्या जागेत शुक्रवारी दुपारी रिंगण सोहळा पार पडला. विदर्भातून आलेल्या पालख्यांसह हजारो भाविकांची यावेळी उपस्थिती होती.
रीतेश नारळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला रुक्मिणीच्या माहेरी दहीहंडीसाठी वारकऱ्यांचा मेळा असतो. त्याच्या एक दिवस आधी तेथून दहा किलोमीटरवरील कुऱ्हा येथे तिवसा रोडवरील खुल्या जागेत शुक्रवारी दुपारी रिंगण सोहळा पार पडला. विदर्भातून आलेल्या पालख्यांसह हजारो भाविकांची यावेळी उपस्थिती होती. या सोहळ्याला उपस्थित मान्यवर महिलांनाही यावेळी फुगडीचा फेर धरण्याचा मोह झाला. विठ्ठलनामाच्या गजरात भाविक दंग झाले होते.
सोहळ्याचे आयोजन हभप रंगराव टापरे महाराज यांंच्या अध्यक्षतेखाली झाले. मुक्कामी असलेल्या २५ पालख्यांनी ८ वाजता ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात करून दुपारी १२ वाजता रिंगणस्थळी दाखल झाल्या. आ. यशोमती ठाकूर, ना. नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, नवनीत राणा, निवेदिता चौधरी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी सभापती सीमा सावळे, माजी आमदार साहेबराव तट्टे, अच्युत महाराज सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुधीर दिवे, किरण पातूरकर, सरपंच विजयसिंह नाहाटे, पं.स. सभापती अर्चना वेरुळकर, उपसभापती लुकेश केने, सदस्य मंगेश भगोले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रीतेश पांडव, संदीप आमले, रविराज देशमुख, भामटी महाराज आश्रमचे हभप ज्ञानेश्वर महाराज पातशे यांच्यासह जिल्हाभरातून भाविक उपस्थिती होती. दुपारी ४ वाजता पालख्यांनी कौंडण्यपूरकडे प्रस्थान केले. संगप्पा हुंडीवले, राजू बिंड, नरेश वाडी, राजू टेकाळे, श्याम इखार, डॉ. पाचघरे, सुभाष आसरे, रामेश्वर पाचगडे यांच्यासह ग्रामस्थांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले. कुहृयाचे ठाणेदार सुनील किणगे व प्रभारी तहसीलदार पंधरे यांची पूर्णवेळ उपस्थिती होती.
दरम्यान, कौंडण्यपूर इथे शासकीय महापूजा व दहीदांडीचा कार्यक्रम शनिवारी होईल. पंढरपूरप्रमाणे येथेही २०१२ पासून शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. दरवर्षी येथे शासनाचे प्रतिनिधी पूजेला उपस्थित असतात. २४ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता शासकीय महापूजा व दुपारी ५ वाजता येथील गोकुळपुरीत दहीहंडी होणार आहे.