उत्पादनवाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाची कास धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 09:59 PM2018-06-16T21:59:42+5:302018-06-16T21:59:52+5:30
आधुनिक शेती करत असताना शेतकऱ्यांना एकत्र येऊन सामूहिक जलसिंचनाची साधने वाढवावी लागतील तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगानेच उत्पादनवाढ शक्य आहे, असे प्रतिपादन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : आधुनिक शेती करत असताना शेतकऱ्यांना एकत्र येऊन सामूहिक जलसिंचनाची साधने वाढवावी लागतील तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगानेच उत्पादनवाढ शक्य आहे, असे प्रतिपादन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत सन २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्देशाने चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर हे तीन तालुके मिळून स्थानिक संताबाई यादव सभागृहामध्ये खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या अध्यक्षस्थानाहून आ. जगताप यांनी मार्गदर्शन केले. उद्घाटन जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सी.यू. पाटील, निवृत्त शास्त्रज्ञ राजेंद्र जाणे होते. तज्ज्ञ शेतकरी मार्गदर्शक म्हणून सुधीर जगताप, नांदसावंगी येथील प्रगतिशील शेतकरी अनिल सरोदे उपस्थित होते. सर्वप्रथम कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे यांनी केले.
सोयाबीन पिकाच्या नवीन जाती, जिवाणू संवर्धकाच्या बीजप्रक्रिया पद्धती, पी.एस.बी. रायझोबियमचे महत्त्व, सुधारित पेरणी पद्धती तसेच सेंद्रिय खताचे उत्पादनवाढीमध्ये महत्त्व याबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केले. कपाशीबाबत राजेंद्र जाणे यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी धामणगाव रेल्वेचे अजय तळेगावकर, चांदूर रेल्वे व्ही.सी. केवे, नांदगाव खंडेश्वर अरुण गजभिये परीक्षित मालखेडे यांनी परिश्रम घेतले.