तपोभूमी आहे तेथेच ठेवा
By admin | Published: April 12, 2017 12:43 AM2017-04-12T00:43:00+5:302017-04-12T00:43:00+5:30
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गुणवंतबाबा तपोभूमी शिंदी खुर्द सोमठाणा या तिर्थस्थळाचे करजगाव प्रकल्पाचे घोषित क्षेत्रात संरक्षण करावे,
भिक्कू संघाची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली
अचलपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गुणवंतबाबा तपोभूमी शिंदी खुर्द सोमठाणा या तिर्थस्थळाचे करजगाव प्रकल्पाचे घोषित क्षेत्रात संरक्षण करावे, अशी मागणी श्री संत गुणवंतबाबा तपोभूमी सेवाश्रम-बुद्ध विहार अंतर्गत आॅल इंडिया भिक्कू संघ यांनी अचलपूर उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांची भेट घेऊन केली.
धार्मिक स्थळाच्या संरक्षणाबाबत अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिंदी सोमठाणा येथील तपोभूमीमध्ये साधना, विपश्यना केल्यास दु:ख दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही जागा कायम राहावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विषेश म्हणजे घोषित झालेल्या बुडीत क्षेत्रातच ही जागा कायम असावी असा आग्रही यावेळी धरण्यात आला. प्रकल्पामधील पाण्याने या वास्तूला बाधा होऊ नये म्हणून दगडाची संरक्षण भिंत सभोवताल बांधावी असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी, आॅल इंडिया भिक्कू संघ संरक्षक भदन्त संघरक्षीत महाथेरो, प्रदेशाध्यक्ष आनंद, अहींसह तसेच तपोभूमी सेवाश्रमचे अध्यक्ष विजय इंगळे, सचिव विलासराव थोरात यांचेसह भिक्कू संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)