खल्लार पोलिसांनी रोखली गोवंशाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:19 AM2021-02-23T04:19:22+5:302021-02-23T04:19:22+5:30
सुधारित बातमी आहे. ही घेणे. ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ गुरे मृत, ५७ जनावरे गोरक्षणात खल्लार /दर्यापूर : ...
सुधारित बातमी आहे. ही घेणे.
४१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ गुरे मृत, ५७ जनावरे गोरक्षणात
खल्लार /दर्यापूर : मध्यप्रदेशाहून अकोल्याकडे गोवंश घेऊन निघालेला कंटेनर शनिवार रात्रीच्या सुमारास खल्लार पोलिसांनी पकडला. त्यामध्ये तब्बल ६५ जनावरे कोंबलेली आढळली. पैकी आठ गुरांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. उर्वरित ५७ गोवंश श्री संत गाडगेबाबा गौरक्षण मंडळ माहुली धांडे येथे हलविण्यात आले. खल्लार पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली.
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या खल्लार पोलिसांना दर्यापूर आसेगाव मार्गावरील नरदोडा थांब्याजवळ गोवंश असलेला यूपी २१ बी एन ८३८६ हा कंटेनर दिसला. थांबवून विचारणा केली असता, ट्रकचालक इरफान पठाण (रा. सातोर, मध्यप्रदेश) याने टोलवाटोलवी केली. पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता त्यात ६५ गोवंश आढळून आले. घटनास्थळाहून १६ लक्ष २५ हजार रुपये किमतीचे बैल व २५ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा ४१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल खल्लार पोलिसांनी जप्त केला. घटनास्थळी आमदार बळवंत वानखडे यांनी भेट दिली. माहुली धांडे येथे कंटेनर खाली करतेवेळी गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष गजानन भारसाकळे, तारासिंग साखरे, मुकेश साखरे, उमेश इंगळे, राधेश्याम ठाकरे उपस्थित होते. खल्लारचे ठाणेदार विनायक लंबे यांचे नेतृत्वात दुय्यम ठाणेदार अनंत हिवराळे, जमादार राजू विधळे, सिद्दाम, पोकॉ अविनाश ठाकरे, संतोष राठोड, संतोष चव्हाण व होमगार्ड सह यांनी केली.
--------