तालुक्यात ४६ हजार१२७ हेक्टरसाठी खरिपाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:20+5:302021-05-28T04:11:20+5:30
पान २ ची बॉटम चांदूरबाजार: साधारणतः मृग नक्षत्रापासून शेतीचा खरिप हंगाम सुरू होतो. अंदाजे १५ दिवसांवर खरिप हंगामा ...
पान २ ची बॉटम
चांदूरबाजार: साधारणतः मृग नक्षत्रापासून शेतीचा खरिप हंगाम सुरू होतो. अंदाजे १५ दिवसांवर खरिप हंगामा येऊन ठेपला आहे. मान्सूनचा पाऊस येण्याच्या कालावधीवर शेतीचा हा हंगाम मागे पुढे होऊ शकतो.तरीही २०२१-२०२२ च्या खरिप हंगामाचे नियोजन मे महिन्यातच तालुका कृषी कार्यालयाने केले आहे.
तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०५.५० हेक्टर इतके आहे. तालुक्यातील १७२ गावात विखुरलेल्या या क्षेत्रापैकी ५८ हजार ८८० हेक्टर इतके क्षेत्र पेरणी योग्य आहे. पेरणी योग्य क्षेत्रापैकी ४६ हजार १२७ हेक्टर क्षेत्र खरिपाच्या पेरणी खाली येत असून, उर्वरित अंदाजे १४ हजार हेक्टर इतके क्षेत्र सहा वर्षावरील संत्रा फळपिका खालील आहे.
अशी आहे शेतकरी संख्या
१७ हजार ३८२ अल्पभूधारक
१२ हजार ८६० अत्यल्प भूधारक
१३ हजार ३४३ शेतकरी पाच एकारा पेक्षा जास्त क्षेत्र असलेले
एकूण शेतकरी संख्या ४३ हजार ५८५
बॉक्स
असे आहे यंदाचे नियोजन
२०२१-२०२२च्या खरिप पीका अंतर्गत येणार्या ४६ हजार १२७ हेक्टर क्षेत्रा वरील, पीक निहाय नियोजन तालुका कृषी विभागाने केले आहे.या पीक नियोजनाच्या अंदाजा नुसार तालुक्यात, कापूस २२हजार हेक्टर,सोयाबीन १३ हजार ९८० हेक्टर, तूर ९ हजार ५००हेक्टर, संकरीत ज्वारी ४२२ हेक्टर, उडीद १७५ हेक्टर,मूग ५० हेक्टर या प्रमाणे पीक निहाय खरिपात पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरिपाच्या प्रत्यक्ष पेरणी नंतर खरिपाच्या नियोजित क्षेत्रातघट किंवा वाढ होऊ शकते.
बॉक्स
सन २०२१-२२च्या खरिप हंगामाचे नियोजनात मागिल वर्षी पेक्षा,यावर्षी कोणत्याही पीकाचा पेरा फारसा वाढण्याच्या अंदाज नियोजनात व्यक्त करण्यात आला नाही.तरीही शेतकऱ्यांना बियाणे प्राप्त झाल्यास,सोयाबीनच्या पेरण्यात मागिल वर्षी पेक्षा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण सध्या बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या भावाचा परिणाम सोयाबीनचा पेरा वाढण्यावर होऊ शकतो. कपाशीचा पेरा मागिल वर्षी एवढाच होण्याची शक्यता आहे.मात्र सोयाबीन बियाण्याचे दर वाजवी पेक्षा जास्त वाढवल्यास, शेतकरी शेवटच्या क्षणी कपासाला पसंती देऊ शकतात. मागिल वर्षी कपाशीची प्रत्यक्ष पेरणी १८हजार८४८ हेक्टर क्षेत्रावर झाली होती.तर सोयाबीनची प्रत्यक्ष पेरणी १६हजार १४३हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती.यावर्षी दोन्ही पीका खालील क्षेत्रात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
बॉक्स
अशी होती मागील वषीची स्थिती
मागिल वर्षी कपाशी व सोयाबीन सह खरिपातील प्रत्यक्ष पेरणी,तूर ८हजार ७८१हेक्टर, सं.ज्वारी१७७ हेक्टर, मूग फक्त ७ हेक्टर, उडीद ७६ हेक्टर,इतर पिके ४९१ हेक्टर याप्रमाणे पीक निहाय पेरणी झाली होती.मागिल वर्षी तालुक्यात खरिपाच्या पेरणी योग्य क्षेत्रा पैकी,प्रत्यक्ष ४४ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती.अंदाजे ५हजार हेक्टर इतके क्षेत्रावर अती पावसा,मागिल वर्षी खरिपाची पेरणी होऊ शकली नाही.खरिपातील हे क्षेत्र नंतर रबी पीका कडे वळले होते.
कोट
खरिपाच्या नियोजित क्षेत्रासाठी एकूण २० हजार ९५७ क्विंटल बियाण्याची मागणी तालुक्यासाठी करण्यात आली आहे. यात कापूस ११ हजार क्विंटल, सोयाबीन ८ हजार ९४० क्विंटल, तूर ९५० क्विंटल, ज्वारी ३४ क्विटल या प्रमाणे पीक निहाय बियाण्यांच्या समावेश आहे. कापूस, सोयाबीन व तूरीचे बियाणे, काही प्रमाणात बाजारात उपलबध झाले आहे
अंकुश जोगदंड, तालुका कृषी अधिकारी,
चांदूरबाजार _______________________________