यंदा ३०.९१ लाख हेक्टरमध्यरे खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:08+5:302021-08-02T04:06:08+5:30
अमरावती : पावसाअभावी माघारलेल्या खरिपाच्या पेरण्या मान्सून सक्रिय होताच पूर्णत्वाला गेल्या आहेत. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३० लाख ६१ हजार ...
अमरावती : पावसाअभावी माघारलेल्या खरिपाच्या पेरण्या मान्सून सक्रिय होताच पूर्णत्वाला गेल्या आहेत. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३० लाख ६१ हजार ४०० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. ही ९५ टक्केवारी आहे. यामध्ये काही प्रमाणात अकोला जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यंदाच्या खरिपाकरिता अमरावती विभागात ३२,२८,५०० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ३०,६१,४०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपलेली आहे. अकोला जिल्हा वगळता उर्वरित चारही जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ९५ टक्के प्रमाणात पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्ह्यात सुरुवातीला पावसाची उसंत असल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, ९ जुलैनंतर मान्सून सक्रिय झाल्याने अमरावती विभागात सध्या ८५ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यात ७,०४,८०० हेक्टर (९६ टक्के), अकोला जिल्ह्यात ४,१७,५०० हेक्टर (८५ टक्के), वाशिम ३,९३,००० हेक्टर (९७ टक्के), अमरावती जिल्ह्यात ६,७७,४०० (९८ टक्के) व यवतमाळ जिल्ह्यात ८,६८,६०० हेक्टर ( ९५ टक्के) क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहे.
बॉक्स
पीकनिहाय क्षेत्र
पश्चिम विदर्भात सोयाबीन १४,१४,९०० हेक्टर, कपाशी ९,९१,९००, तूर ४,११,७०० हेक्टर, मुग ६३,४०० हेक्टर, उडीद ४७,८०० हेक्टर, मका ३७,६०० हेक्टर, धान ५,६००, बाजरी ३५,६०० हेक्टर, भुईमूग ९०० हेक्टर, तीळ १,१०० हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. आतापर्यत४६०.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही अपेक्षित पावसाचे ११६ टक्के आहे. अमरावती वगळता चारही जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे.