येवदा कृषी मंडळमार्फत खरीप पेरणी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:50+5:302021-06-11T04:09:50+5:30
उपस्थित शेतकऱ्यांना निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क व शेणखत कंपोस्ट करूनच शेतात वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावर्षी पेरणी करताना पट्टापेर ...
उपस्थित शेतकऱ्यांना निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क व शेणखत कंपोस्ट करूनच शेतात वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावर्षी पेरणी करताना पट्टापेर पद्धत, सरी वरंबा पद्धतीने पेरणी करण्याबाबतचे महत्त्व पटवून त्या पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावर्षी एका गावात किमान २५ शेतकऱ्यांनी यंत्राने पेरणी केल्यास प्रतिशेतकरी ५ एकरपर्यंत दोन हजार अनुदान कृषी विभागामार्फत देण्यात येणार असून, याचा लाभ घेऊन संधीचे सोने करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.
मागील वर्षी जास्त घनदाट पद्धतीने कापूस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडी व बुरशींमुळे बोंडसड झाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना ४ बाय १ फूट पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मूग पिकात येणारा विषाणूजन्य लिप क्रिनिकल या रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रकियेत एमिडाक्लोप्राइड ७० टक्के प्रतिकिलो बियाण्यास लावावे. त्यानंतर जैविक बुराशीनाशक ट्रायकोड्रमा ५ मिली व जैविक कॉन्सरशिया २५ मिली प्रतिकिलो बियाण्यास लावूनच पेरणी करावी. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
येवदा कृषी मंडळात मौजे येवदा, वरूड बु, राजखेड, अंतरगाव शिवाजी, पिंपळोद, घोडचंदी, जैनपूर वडनेर, कातखेड, सगरवाडी गावात कोरोना प्रादुर्भाव जास्त होऊ नये, यासाठी कृषी केंद्रावर जास्त गर्दी न करता कृषिसेवा केंद व कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे पोहच करण्यात आली.
सदर खरीपपूर्व सभा घेण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी राठोड साहेब, पर्यवेक्षक सावरकर कृषी सहायक वासुदेव भोई, मनोज कुमावत, अशोक मोहरकार, राजेश बेलोकर, डवरे तसेच गावातील शेतकरी कृषी मित्र अमोल पुरी, अनिल पुरी, सचिन डामरे, प्रदीप पुरी, संदीप भागवत, भास्कर उमाळे, अजय कोकाटे, प्रल्हाद उमाळे, रंगराव शेंडोकार, मयूर दामरे, संतोष चव्हाण, विशाल बघेले, मुकिंदा भारती व इतर शेतकरी उपस्थित होते.