कोरोना काळात आदिवासींना खावटीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:56+5:302021-07-14T04:15:56+5:30
(कॉमन) अमरावती : लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावलेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने खावटी अनुदान लागू केले. ...
(कॉमन)
अमरावती : लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावलेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने खावटी अनुदान लागू केले. त्याअनुषंगाने राज्यात आतापर्यंत ९ लाख ६१ हजार १९२ आदिवासींच्या खात्यात प्रतिदोन हजार रूपयांप्रमाणे डीबीटीद्धारे अनुदान जमा करण्यात आले आहे. तर, दोन हजारांच्या किराणा किट वाटप संथगतीने सुरू आहे.
अमरावती, नागपूर, नाशिक व ठाणे अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत ११ लाख २ हजार ४८७ आदिवासींनी खावटी अनुदान व किराणा किट मिळण्यासाठी आधारबेस नोंदणी केली होती. त्यापैकी १३ जुलैपर्यंत ९ लाख ६१ हजार १९२ आदिवासींच्या खात्यात प्रति दोन हजार रुपयांप्रमाणे डीबीटीद्धारे अनुदान जमा झाले. ५१७५ आदिवासींचे अर्ज त्रुटीमुळे नाकारण्यात आले आहे. आधारबेस आणि बेआधार असे एकूण ११ लाख २२ हजार २३३ आदिवासींनी खावटी अनुदानासाठी अर्ज सादर केले आहे. यात छाननी करून पात्र आदिवासींना खावटीचा लाभ देण्यासाठी आदिवासी विभागाने पुढाकार घेतला आहे. डीबीटीद्धारे प्रत्येक आदिवासींच्या बँक खात्यात दोन हजारांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, किराणा किटचे वाटपाचे नियोजन संथगतीने सुरू असल्याने आदिवासींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खावटी वाटपाचे राज्यात ३० एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत नियोजन केले जात आहे.
----------
किराणा किट वाटपासाठी शिक्षकांची मदत
खावटी अनुदानापासून पात्र लाभार्थी आदिवासी कुटुंब वंचित राहू नये, याची काळजी घेण्यात येत आहे. कोरोना काळातही किराणा किट वाटपासाठी शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे. हल्ली आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे बंद असल्याने शिक्षक घरोघरी जाऊन आदिवासींना किराणा किट वाटप करीत आहेत. मात्र, किराणा किट वरिष्ठांकडून वेळेवर मिळत नसल्याने अद्यापही अनेक आदिवासी बांधव किराणा किट मिळण्यापासून वंचित आहेत.
-------------------
अपर आयुक्तनिहाय मंजूर खावटी अनुदान
अमरावती : १६५७६९
नागपूर: १७१०१८
नाशिक:४१२६२५
ठाणे: २११७८०
-----------
राज्यात आतापर्यंत ५० हजार आदिवासींना किराणा किटचे वाटप पूर्ण झाले आहे. नागपूर, नाशिक, ठाणे येथे वेग आला आहे. धारणी पीओंकडे किराणा किटचा ट्रक पोहाेचला नाही. तो पोहोचला की तीन ते चार दिवसात वाटप होईल, असे नियोजन आहे. किराणा किटचे वाटप थोडे विलंब झाला आहे. डीबीटी अनुदान
- नितीन पाटील, महाव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ