खोडके ट्रस्टच्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

By admin | Published: January 26, 2016 12:08 AM2016-01-26T00:08:08+5:302016-01-26T00:08:08+5:30

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०१६ चा उदघाटनसोहळा प्रसिध्द अभिनेत्री मिनिषा लांबा ....

Khodke Trust's Cultural Festival inaugurated | खोडके ट्रस्टच्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

खोडके ट्रस्टच्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

Next

अभिनेत्री मिनिषा लांबाची उपस्थिती : पुष्प प्रदर्शनीसह विविध उपक्रमांची रेलचेल
अमरावती : प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०१६ चा उदघाटनसोहळा प्रसिध्द अभिनेत्री मिनिषा लांबा यांच्या हस्ते सोमवारी थाटात पार पडला.
व्यासपीठावर विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, महापौर चरणजितकौर नंदा, काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, आयुक्त गुडेवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, माजी आमदार सुलभा खोडके, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर, गटनेता अविनाश मार्डीकर, माजी महापौर किशोर शेळके उपस्थित होते. प्रास्ताविक सुचिता खोडके, संचालन सूरज हिरे यांनी तर आभार संजय आसोले यांनी मानले. विजेत्यांना पुरस्काराची घोषणा रेखा मग्गिरवार यांनी केली. (प्रतिनिधी)

मुकुंद शेकदार ठरले चॅम्पियन आॅफ दी चॅम्पियन ट्रॉफीचे मानकरी
अमरावती : विदर्भस्तरीय पुष्प प्रदर्शनी स्पर्धेतील सर्वात मानाची ट्रॉफी मानली जाणाऱ्या चॅम्पियन आॅफ दी चॅम्पियन ट्रॉफीचे मानकरी मुकुंद शेकदार ठरले. रोझ ट्रॉफी निर्मला देशमुख यांनी पटकाविली.
शेवंती ट्रॉफी संजय काळे यांना मिळाली तर प्रदर्शनीचे चॅम्पियन अलका गभणे ठरल्या तर फर्स्ट रनर आॅफ ट्रॉफी गायत्री नर्सरीला मिळाली. सेकंड रनर आॅफ शरद सिरसाट ठरले. थर्ड रनर आॅफ श्री शिवाजी हर्टीकल्चर कॉलेज ठरले. प्रथम ग्रुप चॅम्पियन डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी ठरले तर ग्रुप ट्रॉफी द्वितीय क्रमांक प्रथमेश भावे याने पटकाविला. या सर्व विजेत्यांना अभिनेत्री मिनिषा लांबा, महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, माजी आमदार सुलभा खोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

Web Title: Khodke Trust's Cultural Festival inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.