खोपडा प्लॉट वाटपात अधिकाऱ्यांचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:22 AM2019-01-18T01:22:34+5:302019-01-18T01:24:42+5:30
गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना प्रकल्प का रखडला? मुळात प्रकल्पाचे काम होऊच नये, यामध्ये आ.बोंडेंना स्वारस्य आहे. आ. यशोमतींनी प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठविल्यामुळे आतापर्यंत झोपलेले आ. बोंडे जागे झाले अन् सारवासारव करू लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना प्रकल्प का रखडला? मुळात प्रकल्पाचे काम होऊच नये, यामध्ये आ.बोंडेंना स्वारस्य आहे. आ. यशोमतींनी प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठविल्यामुळे आतापर्यंत झोपलेले आ. बोंडे जागे झाले अन् सारवासारव करू लागले. खोपडा ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये खोडतोड कुणी केली?, या भूखंडवाटपात मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे व हे सर्व अधिकाºयांनीच केल्याचा आरोप वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांनी गुरूवारी केला. याविषयीचे निवेदन विभागीय उपायुक्त प्रमोद देशमुख यांना दिले.
खोपडा पुनर्वसनासाठी ४९८ भूखंड वाटप करायचे होते. आता, यामध्ये ५१६ ने वाढ झाली. २००७ च्या ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये खोडतोड करून नंतर शुद्धीपत्रक काढल्यामुळे या प्रकरणात ग्रामसेवक, महसूली, भूमीअभिलेख अधिकाºयांचे हात गुंतलेले आहे. काही लाभार्थ्यांची भूखंड मर्यादा जाणीवपूर्वक वाढविली. बांधकाम नसताना खुल्या भूखंडावर बांधकाम दाखवून मोबदला घेण्याच्या तयारीत आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांच्या संमतीनेच हा प्रकार झाला आहे. यातही पुनर्वसन विभागाने कोणत्याही प्लॉटला नंबर न देता लॉटरी पद्धतीने व निवडणुकीच्या तोंडावर जलदगतीने प्रक्रिया आरंभली आहे. याच पद्धतीत भूखंडवाटपात मोठा घोटाळा होत आहे. हे प्लॉटवाटप अमान्य असल्याचे ठाकरे यांनी उपायुक्तांना सांगितले. पुनर्वसनात भूखंड घोटाळा झाल्याची बाब आम्ही वारंवार जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणली. तथापि, अधिकाऱ्यांना अभय दिल्याने ते आता निर्ढावले आहेत. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विक्रम ठाकरे यांनी केली. यावेळी तिवसा नगरपंचायतीचे अध्यक्ष वैभव वानखडे, वरूड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश काळे, चंद्रकांत जवंजाळ, विलास कोठाळे, प्रकाश कुरवाळे, दशरथराव महल्ले आदी उपस्थित होते.
टोल नाक्यामध्ये ज्यांनी दलाली घेतली, अप्प वर्धा प्रकल्पाच्या मासेमारीच्या कंत्राटात ज्यांनी दलाली खाल्ली व तीन नगरपरिषदांचा टोल ज्यांनी वाढविला त्या झोपी गेलेल्या आमदाराला निवडणुकीच्या तोंडावर आता जाग आली आहे. नागरिकांना भूलथापा देत आहेत
- विक्रम ठाकरे, सभापती,
वरूड पंचायत समिती
अजय लहानेंची चौकशी करा
याबाबत १४ जानेवारील जिल्हाधिकाऱ्यांसी चर्चा झाली. त्यावेळी या घोटाळ्याचे सर्व पुरावे सादर केले. त्यावर चौकशी करण्याऐवजी वेगळा फॉरमुला अवलंबत आहेत. जिल्हा भूसंपादन अधिकाºयाकडे न्याय मागण्यास गेले असता ते हाकलून लावतात. अपमान करतात लहाने हे आ. बोंडे यांचे नाव घेऊन आमच्याशी चर्चा करतात. या भष्ट अधिकाºयांवर कारवाईची मागणी ठाकरेंनी केली.
रेकॉर्डमध्ये खोडतोड, सचिवाला निलंबित करा
खोपडा येथील भूसंपादन प्रकरणात गावठान भूसंपादनासाठी कलम १९ चे अधिसुचनेत बेकायदेशीर दुरूस्ती करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अधिक मोबदला मिळण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या घरांचे बांधकाम दाखविलेले आहे. राजकीय दबावातूनच हा प्रकार झाला असल्याने ग्रामपंचायत सचिवाला जबाबदार धरून चौकशीअंती निलंबनाची मागणी विक्रम ठाकरे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली आहे.