वादाचा वचपा काढला; चाकूने सपासप वार करत तरुणाचा खृून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:46 PM2021-10-25T17:46:07+5:302021-10-25T17:52:54+5:30

भांडणाचा वचपा म्हणून एका तरुणाला चाकूने भोसकून संपविण्यात आले. अमरावतीच्या विलासनगर येथील एका बारसमोर रविवारी रात्री ९ ते ९.४५ च्या सुमारास हा थरार घडला.

Khrun of youth in Vilasnagar; Crime against four | वादाचा वचपा काढला; चाकूने सपासप वार करत तरुणाचा खृून

वादाचा वचपा काढला; चाकूने सपासप वार करत तरुणाचा खृून

googlenewsNext
ठळक मुद्दे चौघांविरुद्ध गुन्हा दाखलआरोपी निष्पन्न : दोन पथके कार्यान्वित

अमरावती : अर्ध्या तासापूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा म्हणून एका तरुणाला चाकूने भोसकून संपविण्यात आले. विलासनगर येथील एका बारसमोर रविवारी रात्री ९ ते ९.४५ च्या सुुमारास हा थरार घडला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाला वेग दिला आहे.

अक्षय बलराम पांडे (२४, रा. मसानगंज, अमरावती) असे मृताचे नाव आहे. माहितीनुसार, रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींचा अक्षय सोबत दुसऱ्या एका बारसमोर वाद झाला. त्या भांडणाच्या कारणावरुन अक्षय इंगळे व विशाल यादव यांनी अक्षयच्या पोटावर, गळ्यावर, कपाळावर चाकूने वार केले तर धीरज जामनेकर व मन्या डोंगरे यांनी शिवीगाळ करुन थापडा बुक्क्यांनी मारहाण करुन त्याला ठार मारले. अक्षयला रक्तबंबाळ स्थितीत आदर्श बारसमोर टाकून आरोपींनी पळ काढला. तर काही प्रत्यक्षदर्शिनी याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. 

याप्रकरणी स्वप्नील रमेश भोयर (२७, रा. शिवनगर, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, अमरावती) यांच्या तक्रारीवरूनअक्षय इंगळे (रा. महेंद्र काॅलनी), विशाल यादव (रा. अमरनगर), धीरज जामनेकर व मन्या डोंगरे (दोन्ही रा. विलास नगर) या चौघांविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या शोधार्थ दोन पथके बनविण्यात आली आहेत.

डीसीपी, एसीपी घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्यासह गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, प्रवीण वांगे, सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, उपनिरीक्षक बापुराव खंडारे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून शव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित करण्यात आले. तथा आरोपींची धरपकड करून सोमवारी पहाटे दोन स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली.

Web Title: Khrun of youth in Vilasnagar; Crime against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.