हे तर ‘खुनशी’ उद्यान !

By admin | Published: June 5, 2016 12:03 AM2016-06-05T00:03:28+5:302016-06-05T00:03:28+5:30

छत्री तलाव मार्गावरील निर्माणाधीन उद्यानाचे कुपंण जंगलातील वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. या कुंपणात अडकून शुक्रवारी एका हरणाचा मृत्यू झाला.

This is the 'Khunshi' garden! | हे तर ‘खुनशी’ उद्यान !

हे तर ‘खुनशी’ उद्यान !

Next

कुंपण झाले मृत्यूसापळा : आणखी एका वन्यजीवाचा मृत्यू
वैभव बाबरेकर अमरावती
छत्री तलाव मार्गावरील निर्माणाधीन उद्यानाचे कुपंण जंगलातील वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. या कुंपणात अडकून शुक्रवारी एका हरणाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी आणखी एक नीलगाय कुंपणात धडकून ठार झाली. जैवविविधतेच्या विस्तारासाठी निर्माण करण्यात आलेले हे उद्यान ‘खुनशी उद्यान’ ठरले आहे.
छत्री तलावालगतच सामाजिक वनिकरणामार्फत स्व. उत्तमराव पाटील उद्यानाचे निर्माणकार्य सुरु आहे. या उद्यानाभोवताल तारेचे कुंपण असल्याने वन्यप्राण्यांना छत्री तलावावर तहान भागविण्यासाठी जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. या तारेच्या कुंपणाला नीलेश कंचनपुरेसह काही वन्यप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. मात्र, अद्याप त्यासंदर्भात सामाजिक वनीकरण व वनविभागाने कोणतीही दखल घेतली नाही.
दरम्यान, एका आठवड्यापूर्वी या कुंपणात अडकून एक नीलगाय जखमी झाली होती. तसेच बुधवारी पहाटे एक हरिण तारांमध्ये अडकून गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यूदेखील झाला.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा

अमरावती : शनिवारी एक नीलगाय तारेच्या कुंपणावर आदळून जागीच ठार झाली. तीन ते चार हरिण जखमी झालेत. ही बाब मार्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ वनविभागाला कळवून घटनास्थळी बोलावून घेतले होते. त्यामध्ये नीलेश कंचनपुरे उद्यानजवळ पोहोचले. वडाळी वनपरीक्षेत्र अधिकारी एच. व्ही. पडगव्हाणकर यांच्यासह शिकारी प्रतिबंधक पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि नीलगाईचा मृतदेह पशुवैद्यकीय चिकित्सकांकडे शवविच्छेदनाकरिता पाठविला आहे. यामध्ये वनविभागाने वनगुन्हा दाखल करून चौकशी सुरु केलीे. त्यामुळे आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न वन्यप्रेमींनी उपस्थित केला आहे.
तारेच्या कुंपणामुळे नीलगाईचा मृत्यू झाला असून यासंदर्भात वन्यप्रेमींनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक मसराम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीतून वन्यप्रेमींकडून करण्यात आली आहे.
जैवविविधता उद्यानातील हत्या थांबवा
उद्यानाचे कुंपण वन्यप्राण्यासाठी जीवघेणे ठरत आहे. वनविभाग व सामाजीक वनीकरण यांच्या हट्टखोर धोरणांमुळे वन्यजीवाच्या जीवाशी खेळ सुरु आहे. त्यातच हरीण व निलगायीचा मृत्यू झाला असून अनेक वन्यप्राणी जखमी झाले आहेत. त्यामुळे या मृत्यूला कारणीभुत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक अविनाश मार्डीकर, उज्जल थोरात, सुरज कछवे, सुरज गवई, श्याम देशपांडे, आकाश मेटे, सुरज राऊत, धनजय नळस्कर, प्रवीण भस्मे, योगेश देवके, नीलेश कंचनपुरे, सागर मैदानकर यासह आदी वन्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: This is the 'Khunshi' garden!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.