कांडलीतील १४ वर्षीय मुलाचे अपहरण (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:37 AM2021-02-20T04:37:42+5:302021-02-20T04:37:42+5:30

अज्ञाताविरुद्ध गुन्हा : मंगळवारी दुपारपासून बेपत्ता परतवाडा : लगतच्या कांडली ग्रामपंचायत अंतर्गत महावीरनगरमधील १४ वर्षीय मुलाचे चार दिवसांपूर्वी अज्ञात ...

Kidnapping of 14 year old boy in Kandli (modified) | कांडलीतील १४ वर्षीय मुलाचे अपहरण (सुधारित)

कांडलीतील १४ वर्षीय मुलाचे अपहरण (सुधारित)

Next

अज्ञाताविरुद्ध गुन्हा : मंगळवारी दुपारपासून बेपत्ता

परतवाडा : लगतच्या कांडली ग्रामपंचायत अंतर्गत महावीरनगरमधील १४ वर्षीय मुलाचे चार दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची घटना उजेडात आली आहे. स्वप्निल बळीराम वाघमारे (१४) असे अपहृत मुलाचे नाव आहे. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ नंतर ही घटना घडली.

उज्ज्वला बळीराम वाघमारे यांनी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी परतवाडा पोलिसांकडे अपहरणाची तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, स्वप्निल हा १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्याच्या कार्तिक नामक मित्रासोबत फिरायला गेला होता. मात्र, रात्री १० वाजेपर्यंत तो घरी परतला नाही. उज्ज्वला व कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. अखेर १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली. आपल्या मुलाला अज्ञात इसमाने पळून नेले असावे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. स्वप्निलचा मित्र असलेल्या कार्तिक व त्याची आई लपवाछपवी करीत असल्याचा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी अमरावती शहरात घडलेल्या अपहरणामुळे कांडलीतील हे अपहरण प्रकरण चर्चेत आले आहे. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी दोघांना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या वाघमारे कुटुंबातील स्वप्निलला दोन मोठे भाऊ आहेत. स्वप्निलच्या शोधासाठी त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

कोट

मुलाच्या आईच्या तक्रारीवरून १८ फेब्रुवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन पथक गठित करण्यात आले आहेत. दोघांना चौकशीसाठी बोलावले होते. तपास सुरू आहे.

सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा

--------

Web Title: Kidnapping of 14 year old boy in Kandli (modified)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.