खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

By प्रदीप भाकरे | Published: December 5, 2022 04:47 PM2022-12-05T16:47:47+5:302022-12-05T16:49:10+5:30

यवतमाळ व्हाया मुंबईत शोषण; गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल

Kidnapping and abusing a minor girl, crime filed after she gives birth to child | खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

Next

अमरावती : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मुंबईत नेण्यात आले. तेथे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून पीडित मुलीला गर्भधारणा होऊन तिने मुलाला जन्म दिला. ही धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. क्रिष्णा ग्यानू राठोड (२२, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

तक्रारीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलीची क्रिष्णासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यातून हळूहळू स्नेहबंध जुळले. त्यातून आरोपी क्रिष्णा हा तिला मुंबईला घेऊन गेला. तेथे तो गवंडी काम करीत होता. कामाच्या ठिकाणीच तो पीडित मुलीसोबत एकत्र राहत होता. या काळात त्याने पीडित मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर काही दिवसांपुर्वी ते दोघेही यवतमाळातील आपल्या गावी परतले.

दरम्यान, पीडित मुलीला प्रसव वेदना सुरू झाल्याने तिला अमरावतीमधील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिने मुलाला जन्म दिला. तत्पूर्वी कागदपत्रांच्या तपासणीवरून पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचे बयाण नोंदविले. यावेळी तिने आपबिती कथन केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी क्रिष्णाविरुद्ध अपहरण, बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Kidnapping and abusing a minor girl, crime filed after she gives birth to child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.