म्हशींची कत्तल गोवंश हत्या लपविण्यासाठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:17 AM2017-11-28T00:17:17+5:302017-11-28T00:17:40+5:30

शहरातील विशिष्ट भागात होणारी गोवंश हत्त्या लपविण्यासाठीच म्हशींच्या कत्तलखान्याचा घाट महापालिकेने रचल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

To kill the killings of buffalo cattle! | म्हशींची कत्तल गोवंश हत्या लपविण्यासाठी !

म्हशींची कत्तल गोवंश हत्या लपविण्यासाठी !

Next
ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप : प्रस्तावित कत्तलखान्याला विरोध

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहरातील विशिष्ट भागात होणारी गोवंश हत्त्या लपविण्यासाठीच म्हशींच्या कत्तलखान्याचा घाट महापालिकेने रचल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने ट्रान्सपोर्टनगरस्थित कत्तलखान्याला परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमिवर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाºयांसह भाजप नगरसेवकांनी सोमवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांची भेट घेतली. त्यावेळी हा आरोप करण्यात आला.
कत्तलखान्याला १८ वर्षांनंतर मंजुरी या शीर्षकाने ‘लोकमत’ने एमपीसीबीने दिलेल्या परवानगीचा उहापोह केला होता. त्यापार्श्वभूमिवर विहिंपसह नगरसेवक व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिका प्रशासन व कत्तलखान्याविरुध्द आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात होणारी जनावरांच्या अनधिकृत कत्तलीवर नियंत्रण राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने म्हशींच्या कत्तलखान्याचा प्रस्ताव एमपीसीबीकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला काही अटीशर्ती टाकून परवानगी मिळाली.
या संतभूमित आम्ही कत्तलखाना खपवून घेणार नाही. आमच्या संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचवा, अशी मागणी विहिंपचे विजय शर्मा यांच्यासह नगरसेवक प्रणित सोनी, राधा कुरील, अजय सारस्कर, मिलिंद बांबल, संदीप वैद्य, महेश देवळे, अजितपाल मोंगा, मनोज गोयनका, पप्पू गगलानी, जितेंद्र जैन, अनिल किल्लेकर, मयुर सोनी, हेमेंद्र जोशी आर.बी अटल आदींनी केली. पशूंचे रक्त सांडवून आम्हाला शहराचा विकास नको, असे बजावत कत्तलखाना सुरू झाल्यास जनक्षोभ उफाळेल व त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला.
शहरात कत्तलखाना का नको, याबाबत विविध दाखले आणि न्यायालयीन संदर्भ देण्यात आले. शहरात कत्तलखाना नकोच, असा प्रस्ताव नगसेवकांकडून येत्या आमसभेत टाकण्यात येईल, अशी माहिती उपस्थित नगरसेवकांनी दिली.
यंत्रणा पॉवरफुल करा ना !
संतभूमित कत्तलखाना उभारण्याऐवजी ज्या भागत राजरोसपणे गोह्त्या व अन्य पशूंची कत्तल केली जाते, ते थांबविण्यासाठी पथके नेमा, यंत्रणा पॉवरफुल करा, असा सल्ला यावेळी महापालिका प्रशासनाला देण्यात आला. स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी आणि राजरोसपणे होणाºया गोहत्या दडपविण्यासाठीच कत्तलखान्याचे समर्थन केले जात असल्याचा पुनरुच्चार या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख आणि सहायक पशुशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी मोर्चा सांभाळला.

Web Title: To kill the killings of buffalo cattle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.