बडनेरात गळा दाबून पत्नीची हत्या, आत्महत्येचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:46 PM2019-07-02T22:46:41+5:302019-07-02T22:46:55+5:30

पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्येचे स्वरूप दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मृत महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर उघड झाली. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना मंगळवारी अटक केली. राजू नारायण वाकपांजर (३३), लीलाबाई विजय मोहोड (५०), विजय मोहोड (६०) व आरती अजय मोहोड (२२, सर्व रा. माताफैल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Killing of a wife by killing her husband, making a suicide | बडनेरात गळा दाबून पत्नीची हत्या, आत्महत्येचा बनाव

बडनेरात गळा दाबून पत्नीची हत्या, आत्महत्येचा बनाव

googlenewsNext
ठळक मुद्देपतीसह सासरच्या चार जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आत्महत्येचे स्वरूप दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मृत महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर उघड झाली. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना मंगळवारी अटक केली. राजू नारायण वाकपांजर (३३), लीलाबाई विजय मोहोड (५०), विजय मोहोड (६०) व आरती अजय मोहोड (२२, सर्व रा. माताफैल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अजय विजय मोहोड (२६) हा आरोपी पसार आहे.
पोलीस सूत्रानुसार, पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती राजू वाकपांजर याने सोमवारी बडनेरा पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, सोमवारी मध्यरात्रीच मृत सीमा राजू वाकपांजर यांच्या माहेरची मंडळी बडनेरा पोलीस ठाण्यात पोहोचली. मुलीला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरची मंडळी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तिला सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार वडील भगवान पुंडलिक चक्रनारायण (६०, रा. डोंगरगाव, जि. अकोला) यांनी पोलिसांत नोंदविली. त्यानुसार बडनेरा पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
दरम्यान सीमाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, तिचा गळा दाबून मृत्यू झाला. यावरून बडनेरा पोलिसांनी गुन्ह्यात भादंविचे कलम ३०२ वाढविले आहे. पोलिसांनी पतीसह चौघांना अटक केली असून, त्यांची कोठडी घेतली जाईल. पुढील तपास उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी करीत आहेत.

Web Title: Killing of a wife by killing her husband, making a suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.