जिल्हा परिषदेत शिवसेना ठरणार ‘किंगमेकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:57+5:30

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांचा बोनस कालावधी शासनाने दिला.

Kingmaker to be Shiv Sena in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत शिवसेना ठरणार ‘किंगमेकर’

जिल्हा परिषदेत शिवसेना ठरणार ‘किंगमेकर’

Next
ठळक मुद्देअपेक्षित बहुमताचा आकडा गाठण्यासाठी धडपड : सत्तेच्या बेरजेचे आराखडे बांधणे सुरू

जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात एकीकडे भाजप, शिवसेनेत सत्तास्थापनेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तोच कित्ता अमरावती जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत गिरवला जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात रंगत आहे. येथे शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांचा बोनस कालावधी शासनाने दिला. आता पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या १५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात काढण्यात येणार आहे. त्यावेळी अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या प्रवगार्साठी निघणार, हे निश्चित होणार आहे.
आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणात वेगवान घडामोडी होण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेतील दोन सदस्य हे विधानसभेत पोहोचले. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसचे संख्याबळ घटले आहे. जिल्हा परिषद सभागृहाची सदस्यसंख्या ५९ एवढी आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस २६, राष्ट्रवादी काँग्रेस २, रिपाइं १ आणि शिवसेना ३ असे ३२ सदस्यांच्या बळावर काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता आहे.
दरम्यान, दर्यापूर तालुक्यातील गायवाडी सर्कलचे सदस्य तथा रिपाइंचे काँग्रेस समर्थित विद्यमान वित्त व आरोग्य सभापती बळवंत वानखडे आणि वरूड तालुक्यातील बेनोडा सर्कलचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य देवेंद्र भुयार हे दोन जिल्हा परिषदेचे सदस्य नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवङणूकीत विजयी झाले. त्यामुळे या दोन्ही पदाधिकाºयांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचे राजीनामे प्रशासनाकडे दिले. त्यामुळे ५९ सदस्यीय जिल्हा परिषदेत आता ५७ सदस्य आहेत. सताधारी पक्षासोबत आतापर्यंत ३२ सदस्य होते. त्यांच्या विधानसभेत जाण्याने काँग्रेसकडे केवळ स्वपक्षीय २६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे २८ एवढेच संख्याबळ राहते. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याची शक्यता असल्याने दोन रिक्त जागांवर पोटनिवडणुकीच्या निकालावर पुढच्या सत्तासोपानाचा मार्ग निश्चित होणार आहे. शिवसेनेने यावेळी जर काँग्रेसची साथ कायम ठेवली, तर सध्या असलेली काँग्रेसची सत्ता कायम राहू शकते.
एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे काँग्रेसकडील सत्ता काबीज करण्यासाठी भाजप व अन्य विरोधी पक्ष मिळून सत्तास्थापनेची गणिते जुळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, यासाठीही शिवसेना सोबत असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय विरोधकांच्या हातात झेडपीची सत्ता जाऊ शकणार नसल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. एकंदर जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत शिवसेनेच्या तीन सदस्यांची भूमिका राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

लक्ष पोट निवडणुकीकडे
जिल्हा परिषदेतील दोन पदाधिकारी विधानसभेवर निवडृून गेले आहेत. त्यामुळे बळवंत वानखडे यांचे गायवाडी आणि देवेंद्र भुयार यांचे बेनोडा जिल्हा परिषद सर्कल रिक्त झाले आहे. येथे डिसेंबर महिन्या पोटनिवडणूक झाल्यास, त्याच्या निकालावरही झेडपीच्या सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.

पक्षीय बलाबल
काँग्रेस २६, भाजप १३, प्रहार ०५, शिवसेना ०३, राष्टÑवादी काँग्रेस ५, लढा १, युवा स्वाभिमान २, अपक्ष १, स्वाभिमानी शेतकरी १, रिपाइं १, बसपा १; एकूण ५९

Web Title: Kingmaker to be Shiv Sena in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.