किसानसभा, माकपने केला सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:44+5:302021-06-18T04:09:44+5:30

यामध्ये शेतकऱ्याचे मुळावर घाव घालणारे तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा ठराव करावा, सर्व वस्तूची भडकलेली महागाई कमी करा, ...

Kisan Sabha, CPI (M) protested against the government | किसानसभा, माकपने केला सरकारचा निषेध

किसानसभा, माकपने केला सरकारचा निषेध

Next

यामध्ये शेतकऱ्याचे मुळावर घाव घालणारे तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा ठराव करावा, सर्व वस्तूची भडकलेली महागाई कमी करा, लॉकडाऊनच्या काळात दिलेली विजेची भरमसाठ वाढीव बिले माफ करा, महात्मा फुले कर्जमाफी योजनेची कडक अंमलबजावणी करा, रासायनिक खतांची दरवाढ रद्द करा, दुधाचे भाव पूर्वीसारखे ३५ रुपये लिटर करा, रेशनधारकांना धान्याचा पुरवठा सुरळीत व विनामूल्य करा, इंधनाची दरवाढ कमी करा, वृद्ध, निराधार व अपंग यांना वाढीव अनुदानाचे वाटप त्वरित करावे, सर्वांना कोविड लसीकरण मोफत करा आदी मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे व निदर्शने केली व याबाबतचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी किसान सभेचे देवीदास राऊत, माकपाचे रामदास कारमोरे तसेच गणेश कुमरे, हरिश्चंद्र गोखे, गीता वायरे, शेखर उईके, वर्षा मेश्राम, रणवीर कुमरे, प्रवीण ठाकरे, प्रकाश बनसोड, बबन मोहोड, रामेश्वर ठाकरे, राजेंद्र कदम, बाबाराव आकोटकर, हरिसिंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Web Title: Kisan Sabha, CPI (M) protested against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.