किसान सभा, माकपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:39+5:302021-06-19T04:09:39+5:30

नांदगाव खंडेश्वर : किसान सभा व माकपच्यावतीने महागाई विरोधात धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. पेट्रोल ...

Kisan Sabha, CPI (M) 's dam movement | किसान सभा, माकपचे धरणे आंदोलन

किसान सभा, माकपचे धरणे आंदोलन

Next

नांदगाव खंडेश्वर : किसान सभा व माकपच्यावतीने महागाई विरोधात धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेली भरमसाठ वाढ, स्वयंपाकाच्या गॅसमध्ये केलेली दरवाढ कमी करण्यात यावी. खरीप हंगामात रासायनिक खताचा तुटवडा जाणवू लागला त्याचे त्वरित नियोजन करावे. भरमसाट आलेली वीज बिले कमी करावी. शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी किसान सभेचे जिल्हा सहसचिव श्याम शिंदे, माकपचे मोहसीन शेख, दिलीप महल्ले, अनिल मारोटकर, रामदास मते, प्रकाश मारोटकर, विजय सहारे, प्रभाकर सुने, पांडुरंग ढवळे, अमोल सवटे, रुपेश केशरखाणे, विजय पाटील, सुरेश हळदे, किशोर पुंड, राहुल महोड, तुळशीराम जेठे, कांतेश्र्वर पुंड, रितेश कटाने, मारुती बंड, संजय वासनकर, भास्कर कुंबरे, शहनशहा, शोयब रजा, दिगंबर घोडे होती.

===Photopath===

180621\img-20210618-wa0006.jpg

===Caption===

किसान सभा व माकपचे विविध मागण्यांसाठी आंदोलन.

Web Title: Kisan Sabha, CPI (M) 's dam movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.