‘किसान सन्मान’ मिशनमोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 09:48 PM2019-02-10T21:48:43+5:302019-02-10T21:49:08+5:30

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल रुजू होतील. त्यानंतर ‘किसान सन्मान’ मिशन मोडवर राहणार आहे.

'Kisan Samman' on MissionModwar | ‘किसान सन्मान’ मिशनमोडवर

‘किसान सन्मान’ मिशनमोडवर

Next
ठळक मुद्देप्रशासनाच्या हालचाली गतिमान : फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या खाती अनुदान

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल रुजू होतील. त्यानंतर ‘किसान सन्मान’ मिशन मोडवर राहणार आहे.
शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूददेखील केलेली आहे. दोन हजारांचे तीन टप्पे वर्षभºयात अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. या योजनेचा पहिला टप्पा तरी या महिन्याअखेर शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. योजनेची घोषणा केल्याच्या तिसºया दिवशीच राज्य शासनाचे आदेश धडकले व कृषी महसूलसह जिल्हा परिषदेला २६ फेब्रुवारीपर्यंत याद्या तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. योजनेसाठी पात्र शेतकºयांचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील तत्काळ प्राप्त करून घेण्याची कार्यवाही युद्धस्तरावर सुरू झालेली आहे. नव्या जिल्हाधिकाºयांच्या अजेंड्यावर ही योजना राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत या महिन्याअखेर शेतकºयांच्या बँक खात्यावर दोन हजार रूपये जमा झालेच पाहिजे, असा शासनाने चंग बांधला आहे. कुठल्याही परिस्थितीत २० फेब्रुवारीपूर्वी शेतकऱ्यांची माहिती संकलित करून याद्या तयार करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने समित्या गठीत
अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत प्रतिशेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात मिळणार आहे. वनहक्क कायद्यानुसार जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचाही योजनेत समावेश होणार आहे. ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक कमाल धारणा क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या स्थापण्यात आल्या आहेत. तलाठी ग्राम समितीचे प्रमुख आहेत. सध्या या समितीचे काम जोमात सुरू झालेले आहे.
मुख्य सचिवांद्वारा दोन वेळा व्हिसीद्वारे आढावा
केंद्राच्या बजेटनंतर तिसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी ‘किसान सन्मान’साठी चार फेब्रुवारीला परिपत्रक जारी केले. पाच तारखेला यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, सीईओ व कृषी विभागाचे अधिकाऱ्यांची व्हिसी घेतली. सात तारखेला पुन्हा विभागीय आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिसीद्वारे संवाद साधला. या योजनेसंदर्भात ६ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व दुसऱ्याच दिवसी तालुका स्तरावर तहसीलदारांनी बैठकी घेतल्या. एकंदरीत शासनस्तरावर या योजनेविषयी अत्यंत गांभीर्याने घेतल्या जात आहे. आचारसंहितेपूर्वी या महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाणार आहे.

Web Title: 'Kisan Samman' on MissionModwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.