यास्मिननगरात युवकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:30+5:302021-07-12T04:09:30+5:30

अमरावती : काकाच्या मुलासोबत झालेल्या भांडणावरून एका युवकाला लाथाबुक्क्याने मारहाण करून मांडीवर चाकूने वार केल्याची घटना ...

Knife attack on youth in Yasminnagar | यास्मिननगरात युवकावर चाकूहल्ला

यास्मिननगरात युवकावर चाकूहल्ला

Next

अमरावती : काकाच्या मुलासोबत झालेल्या भांडणावरून एका युवकाला लाथाबुक्क्याने मारहाण करून मांडीवर चाकूने वार केल्याची घटना नागपुरी गेट ठाणे हद्दीतील यास्मिननगरात ९ जुलै रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चाैघांविरुद्ध शनिवारी गुन्हा नोंदविला.

वसीम करोडपती, शोएब बन्नू (दोन्ही रा. जमील कॉलनी, नदीम अंधा रा. रिंगरोड लालखडी, बाबा रा. यास्मिन नगर असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मोहसीन खान ऊर्फ छोटू दाऊद खान (२७, रा. गुलीस्तानगर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. फिर्यादी हे त्यांचे दुसरे घर यास्मिननगर येथे उभा असताना आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या काकाच्या मुलासोबत झालेल्या वादातून युवकाशी भांडण करून शिवीगाळ केली. चौघांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नंदीम अंधा याने चाकूने वार केला.

Web Title: Knife attack on youth in Yasminnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.