शहरात चाकुबाज सुसाट? पाच तरुण रक्तबंबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 12:08 AM2022-10-19T00:08:20+5:302022-10-19T00:08:43+5:30

जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली, तर प्राणघातक हल्ला करून पळून गेल्याची एक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी येथील देशी दारू दुकानाजवळ घडली. सुनील साहू (५२) हे दारू दुकानात साफसफाई करताना एका दुचाकीहून तीन तरुण दारू पिण्यासाठी आले. तेथे त्यांनी मद्य घेतले. तेथे शिवीगाळ करत असताना सुनील साहू यांनी त्यांना हटकले. त्यातील एकाने साहू यांच्या पोटात चाकू भोसकला. त्यांनी आरडाओरड करताच ते तिघेही पळून गेले.

Knives in the city? Five young bloods | शहरात चाकुबाज सुसाट? पाच तरुण रक्तबंबाळ

शहरात चाकुबाज सुसाट? पाच तरुण रक्तबंबाळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात चाकुबाज सुसाट सुटले की काय, अशी शंका यावी अशा चार ते पाच घटनांमध्ये चाकूने वार करण्यात आले. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्या दोन प्रकरणात हाफमर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोतीनगर भागात शिवाजी अब्रुक (३०, रा. मलकापूर) यांची दुचाकी अडवून मागे बसलेल्या सौरभ भेेंडे (२४, सरस्वतीनगर) व अतुल भिलकर (४०, वैशाली कॉलनी) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांंना काठीने बेदम मारहाण करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजी अब्रुक यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी अक्षय बाभूळकर (२५, वल्लभनगर) व अन्य दोन ते तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करण्यात आली. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली, तर प्राणघातक हल्ला करून पळून गेल्याची एक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी येथील देशी दारू दुकानाजवळ घडली. सुनील साहू (५२) हे दारू दुकानात साफसफाई करताना एका दुचाकीहून तीन तरुण दारू पिण्यासाठी आले. तेथे त्यांनी मद्य घेतले. तेथे शिवीगाळ करत असताना सुनील साहू यांनी त्यांना हटकले. त्यातील एकाने साहू यांच्या पोटात चाकू भोसकला. त्यांनी आरडाओरड करताच ते तिघेही पळून गेले. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. गाडगेनगर पोलिसांनी २५ ते ३० वर्षे वयोगटातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मांडीत चाकू भोसकला
नागपुरी गेट भागातील उस्माननगर येथे शेख इम्रान याच्या डाव्या पायाच्या मांडीवर चाकूने वार करण्यात आला. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. भावाला मारहाण करत असताना शेख इमान हा त्याला सोडवायला गेला असता आरोपी शेख वसीमने त्याच्यावर चाकू चालविला, तर फिर्यादी इर्शाद शहा याला देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  

रोहनखेड्यात करंगळीवर वार
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहनखेडा पर्वतापूर येथील संदीप रायबोले (४०) यांच्याशी लोंबाझोंबी करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सूरज रायबोले हा वाद घालत असताना त्याच्या हातातील चाकू संदीपच्या मानेवर व करंगळीवर लागला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दोघेही दारू पित असताना हा प्रकार घडला.

 

Web Title: Knives in the city? Five young bloods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.