बँकिग व्यवहाराचे ज्ञान घेणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 09:49 PM2019-01-16T21:49:24+5:302019-01-16T21:49:46+5:30

बँकिग व्यवहाराविषयी समाजात जागृती निर्माण करून नोकऱ्या मिळत नसल्याने ओबीसी युवकांनी उद्योगधंद्याकडे वळावे, यासाठी बँकिग व्यवहाराचे ज्ञान घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले.

Knowledge of banking transaction need of time | बँकिग व्यवहाराचे ज्ञान घेणे काळाची गरज

बँकिग व्यवहाराचे ज्ञान घेणे काळाची गरज

Next
ठळक मुद्देसुनील फुंडे : ओबीसी संग्राम परिषदतर्फे अभ्यास वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बँकिग व्यवहाराविषयी समाजात जागृती निर्माण करून नोकऱ्या मिळत नसल्याने ओबीसी युवकांनी उद्योगधंद्याकडे वळावे, यासाठी बँकिग व्यवहाराचे ज्ञान घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले.
भंडारा जिल्हा ओबीसी संग्राम परिषदेच्यावतीने साखरकर सभागृह येथे दोन दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन बुधवारला पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रा. ज्ञानेश वाकूडकर, ओबीसी मुक्ती मोचार्चे संस्थापक ज्ञानेश चौधरी, प्रशांत पवार, जे. एम. पारधी, विजय कापसे, बेलाचे सरपंच पुजा ठवकर, नगरसेविका जयश्री बोरकर उपस्थित होते.
ओबीसी समाज संघटनेची काळाची गरज असून जातीपातीचे राजकारण सोडून सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन प्रा. ज्ञानेश वाकूडकर यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ओबीसी समाजातील समस्यांचे कथन केले. ओबीसींच्या विकासासाठी शासनाकडून तोकडी उपाययोजना केली जात आहे. सरकारला जागे करण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्रीत येण्याची गरज आहे. अभ्यास वर्गाकरीता जिल्ह्यातील ३०० च्या वर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष आजबले यांनी केले. संचालन कलाम शेख, तर आभार प्रदर्शन दिपक मेंढे यांनी केले.

Web Title: Knowledge of banking transaction need of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.