राष्ट्रसंतांचा कोंडेश्वर दर्शनाचा अदभूत प्रसंग!
By admin | Published: October 30, 2015 12:34 AM2015-10-30T00:34:07+5:302015-10-30T00:34:07+5:30
एकदा बाल माणिक अलमस्त वृत्तीत फिरत असताना बडनेराजवळील कोंडेश्वर तीर्थक्षेत्री पायीच शिवलिंगाच्या दर्शनासाठी गेले व शिवलिंगाचे दर्शन घेऊन अलमस्त स्थितीत देवळाचे गाभाऱ्यामध्ये पहुडले.
नीळकंठ जेवडे नांदगाव खंडेश्वर
एकदा बाल माणिक अलमस्त वृत्तीत फिरत असताना बडनेराजवळील कोंडेश्वर तीर्थक्षेत्री पायीच शिवलिंगाच्या दर्शनासाठी गेले व शिवलिंगाचे दर्शन घेऊन अलमस्त स्थितीत देवळाचे गाभाऱ्यामध्ये पहुडले. श्रावणमासातील गर्दीमुळे त्यांना त्रासही झाला. रात्री १२ वाजतानंतर ते कोंडेश्वरहून पायीच अंबानगरीत पोहोचले. त्यांचे ते सडसडीत लुकडेसे उंच शरीर. कमरेला फक्त एक छोटा दुपट्टा गुंडाळलेला. शेंडी वाढलेली, डोळे उन्मनीचे तंद्रित व चेहरा हसरा, अशा अवस्थेत माणिक रात्री शहरातून फिरत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसाला दिसला. पोलिसाला संशय येताच, ''हा आवारा मुलगा कोण आहे व कोठे फिरत आहे? त्याने शिटी वाजवून ‘ठहरो’ असा आवाज दिला आणि जवळ जाऊन माणिक बाबाला दमदाटी करायला लागला. त्यावेळी बाल माणिक हे हसायला लागले व अलमस्त अवस्थेत भजन म्हणायाला लागले. पोलिसाचा राग अनावर झाला. ते म्हणाले चल तुझे ठाणे में बडे साहाब के पास ले जाता हुँ! और कोठडी में बंद करता हुँ।
माणिक पुन्हा हसत जमादारास म्हणतो, जमदार साहाब जल्दी ले चलो बडे साहाब के पास वह मेरे दर्शन से बहुत खूश होंगे. पोलीस जमादाराने त्या अवलिया अवस्थेतील बाल माणिकला पोलीस ठाण्यात आणले व साहेबांना सांगू लागले की ‘साहाब, यह पागल लडका सिधी बात भी नहीं करता और कुछ पुछा तो हसने लगता है और भजन सुनाता है।’ त्या अधिकाऱ्याने त्या बाल माणिककडे पाहिले तो अधिकारी उभा झाला व माणिक देवाचे दर्शन घेऊन म्हणतो. अरे! यह असे तो तुकड्या बाबा है। व पश्चातापाने महाराजांना म्हणतो, महाराजजी हमारे पुलिसवालेने आपको बहोत तकलीफ तो नहीं दी? तुकडोजीबाबा म्हणतात, नाही साहेब, पुलिसाने मोठ्या प्रेमाने मला तुमच्या भेटीसाठी येथे आणले, बहुत अच्छे है आपके पुलिस जमादार! तेव्हा त्या पोलिसालाही पश्चाताप झाला व त्याचे डोळे भरून आले आणि तो महाराजांना माफी मागू लागला व माणिकबाबाचे पूजन केले. हा प्रसंगी वंदनीय तुकडोजी महाराजांनी ‘माझी आत्मकथा’ या काव्य संग्रहात नमूद केला आहे. ते म्हणतात,
‘कोंडेश्वरी आम्ही दर्शनासी गेलो
दर्शन पावलो शंकराचे।
श्रावण सोमवार पाहुनिया
दिन केले मी भजन देऊळाशी।।
निघालो मी तेथूनी सायंकाळी घरा, मार्गासी चकरा झाल्या माझ्या।
अमरावतीला येण्या रात्र झाली बहू, पोलिसाने दिली शिटी मागे।।
उघडा मी धतींग-सुडके नेसलो,
शिपाया लाभाने एकाएकी।
म्हणे, गाढवीच्या कोठे चोरी केली, कोणाची फोडली भींत आता।।
मज आले हसू काय हो बोलता, गरिबाशी बाता सुनावणी।
आता आम्ही आलो कोंडेश्वराहुनी, बहुत फजिते भोगूनिया।।
बडा साला भक्त म्हणोनिया त्याने, दिलीस जोराने पाठी थाप।
चल बे ठाण्यात कोंडतो नेवोनी, ऐसे म्हणूनी ओढी मज।।
असे भजन गायिले.