महिला तलाठ्याला कार्यालयात कोेंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:15 AM2017-07-20T00:15:46+5:302017-07-20T00:15:46+5:30
दुबार पेरणीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात गोंधळ घालत कागदपत्रांची फेकफाक केली.
विहीगाव येथील घटना : सात जणांची पोलिसात तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : दुबार पेरणीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात गोंधळ घालत कागदपत्रांची फेकफाक केली. विहिगाव येथील तलाठी दीपाली काकासाहेब बावणे हिला कार्यालयाच्या आत कोंडल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी रहिमापूर ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
विहिगावच्या तलाठी दीपाली बावणे बुधवारी नेहमीप्रमाणे कार्यालयात आल्या. काही वेळातच स्थानिक सात शेतकरी दुबार पेरणीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करीत कार्यालयात आले व घोषणाबाजी करीत सामानाची फेकाफेक केली. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न तलाठी बावणे हिने केला. मात्र, ते जुमानले नाही. यानंतर या प्रकरणाची बावणे हिने रहिमापूर ठाण्यात दिवाकर भांबुरकर, निलेश हागोणे, रमेश शेळके, प्रभाकर भांबुरकर, भास्कर भांबुरकर, पुरुषोत्तम गावंडे आदींच्या विरोधात तक्रार दाखल केली . यापैकी एकाचे तलाठ्यांनी तहसीलदारांशी बोलणे करून दिले, मात्र ते एैकण्याच्या मनस्थितीत नव्हते असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर रहिमापूर पोलिसांनी कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मिळाली आहे.