कोतवाली पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 09:50 PM2018-03-03T21:50:03+5:302018-03-03T21:50:03+5:30
बेघर असलेले व फुटपाथवर जीवन जगणाºया गोरगरीब व निराश्रितांना शोधून कोतवाली पोलिसांनी होळीच्या दिवशी गोड खिचडी, पोळीभाजीचे पोटभर जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
संदीप मानकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : बेघर असलेले व फुटपाथवर जीवन जगणाºया गोरगरीब व निराश्रितांना शोधून कोतवाली पोलिसांनी होळीच्या दिवशी गोड खिचडी, पोळीभाजीचे पोटभर जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
सिटी कोतवाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एम. पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन आपल्या काही अधिकाºयांना व पोलिसांच्या सोबताने चौकाचौकांत मिष्टान्नाचे वाटप केले. रेल्वेस्टेशन चौकातील संत गजानन महाराज मंदिरासमोर आश्रयाला बसलेल्या गोरगरीब व निराश्रितांना एका जागेवर बसवून आदरतिथ्याने व सन्मानाने पीआय पाटील यांनी आपल्या सहकार्यसमावेत भोजनाचे वाटप केले. भुकेले असलेल्यांना जेवण दिल्याने त्यांचा आत्मा तृप्त झाल्याचे त्यांच्या चेहºयावरून दिसून आले. स्वत: पोलीस आपल्या हाताने भिकाºयांना जेवण भरवत असल्याचे पाहून येथून ये-जा करणाºया अमरावतीकरांच्या लक्षात येताच पोलिसांनाही भावना असतात व त्यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे त्यांचे मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली. यावेळी दुय्यम पोलीस निरीक्षक कदम, एनपीसी अब्दुल कलाम, पोलीस प्रफुल्ल खोब्रागडे, गजानन देवले, गावंडे आदींचा या सेवाभावी कार्यात सहभाग होता. रेल्वे स्टेशन चौकासह इतरही चौकांत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पीआय पाटील यांनी सांगितले.