धामणगाव, चांदूरमध्ये होणार कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:57+5:302021-05-03T04:08:57+5:30

धामणगाव रेल्वे,चांदूररेल्वे : धामणगाव मतदार संघातील कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तिन्ही तालुक्यात कोविड रूग्णालय सुरू व्हावे ...

Kovid Hospital to be set up at Dhamangaon, Chandur | धामणगाव, चांदूरमध्ये होणार कोविड रुग्णालय

धामणगाव, चांदूरमध्ये होणार कोविड रुग्णालय

Next

धामणगाव रेल्वे,चांदूररेल्वे : धामणगाव मतदार संघातील कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तिन्ही तालुक्यात कोविड रूग्णालय सुरू व्हावे यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व आ. प्रताप अडसड यांनी चांदूर व धामणगाव येथील जागेची पाहणी केली. दरम्यान आगामी आठ दिवसात दोन्ही तालुक्यात धामणगाव व चांदूर तालुक्यात कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

चांदुर रेल्वे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात कोविड रुग्णालय तसेच जुना धामणगाव येथे शासकीय वस्तीगृहात उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली धामणगाव तालुक्यातील निंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच हिंगणगाव येथील कोविड सेंटरसह ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राची पाहणी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार गौरव भळगटिया, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे,गटविकास अधिकारी माया वानखडे, जुना धामनगावचे सरपंच विश्वेश्वर दिघाडे ,प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी सुरज जाधव,दत्तापूरचे ठाणेदार ब्रम्हदेव शेळके आदी उपस्थित होते.

आठ दिवसात होणार कोविड रुग्णालयाला सुरुवात

नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात माझ्या आमदार निधीतून ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत आहे चांदुर रेल्वे धामणगाव रेल्वे तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आता तालुक्यातच उपचार मिळणार आहे आठ दिवसात कोविड रुग्णालय उभारण्याची ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे कोणत्याही रुग्णाने घाबरून न जाता माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केले आहे

Web Title: Kovid Hospital to be set up at Dhamangaon, Chandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.