कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:15 AM2021-09-06T04:15:56+5:302021-09-06T04:15:56+5:30

सन २०१८ ते २१ या बॅचला प्रवेश घेताना ही बाब असंख्य महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना योग्यरीत्या कळविण्यात आलेली नाही. काही महाविद्यालयांनी ...

Krishi Tantraniketan students denied admission to agriculture degree course | कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश नाकारला

कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश नाकारला

googlenewsNext

सन २०१८ ते २१ या बॅचला प्रवेश घेताना ही बाब असंख्य महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना योग्यरीत्या कळविण्यात आलेली नाही. काही महाविद्यालयांनी माहितीपत्रकात ती प्रसिद्ध केली नाही, तर काहींनी विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक लक्षात आणून दिली नाही. कृषी पदवीच्या पहिला व दुसऱ्या वर्षाला प्रवेश न देण्याचा निर्णय उपरोक्त संदर्भ २ हा ६ जानेवारी २०१८ रोजी झाला असताना त्याचवर्षी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा करण्याचे विचाराधीन असतानाही तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम महाविद्यालयांकडून सुरू ठेवण्यात आला. तो याचवर्षी दोन वर्षांचा ठेवायला हवा होता.

यावर्षी कृषी तंत्रनिकेतनच्या अंतिम अभ्यासक्रमाला एकूण ६४२० विद्यार्थी प्रवेशित आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाचा व त्यांच्यावर पडणाऱ्या आर्थिक भाराचा संवेदनशीलपणे विचार करून त्यांना गतवर्षी प्रमाणे कृषी पदवीच्या प्रथम किंवा द्वितीय वर्षाला प्रवेश देणे गरजेचे आहे, असे महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने सादर निवेदनात त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Krishi Tantraniketan students denied admission to agriculture degree course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.