कुऱ्हा येथे शेतकऱ्याने केली फवारणी अन् शेजाऱ्याची पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:15 AM2021-08-15T04:15:22+5:302021-08-15T04:15:22+5:30
करजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात टू-फोर डी या तणनाशकाची फवारणी चुकीच्या पद्धतीने ...
करजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात टू-फोर डी या तणनाशकाची फवारणी चुकीच्या पद्धतीने केल्याने आजूबाजूच्या शेतातील पिके करपली आहेत. त्यामुळे १६ जणांच्या ४० एकर क्षेत्रातील तूर व कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले. तालुकास्तरीय समितीने नुकसानाचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांकडे सोपविला आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील मौजा खेल खुशाल देशमुख येथील शेत सर्व्हे नंबर ५५ ते ते ५८ मधील शेतकरी तथा कुऱ्हा देशमुख येथील पोलीस पाटील पवन देशमुख यांनी आठ दिवसांपूर्वी त्यांच्या ज्वारीच्या शेतात टू-फोर डी हे अतिजहाल तणनाशक सदर कंपनीच्या निर्देशित सूचनांचे पालन न करता व कुठलीही सावधगिरी न बाळगता फवारले. तणनाशक हवेच्या दिशेनुसार ४० एकर क्षेत्रावर पसरून पिके बाधित झाल्याची तक्रार १६ शेतकऱ्यांनी शिरजगाव पोलीस ठाणे व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी पवन देशमुख यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यांनीच दम दिल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन.के. अमझरे, मंडळ कृषी अधिकारी एस.पी. दांडेगावकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ के.पी. सिंग, कृषिसहायक, दिनेश वऱ्हाडे यांच्या तालुकास्तरीय समितीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. समितीला मौसराम दांडगे, राजेंद्र भेंडे, संजय अकोलकर, पंजाबराव अकोलकर, साहेबराव व्यवहारे, संजय ढाकूलकर, श्रीकृष्ण अकोलकर, प्रकाश अकोलकर, बाळुराम अकोलकर, जगन्नाथ अकोलकर, सुरेश अकोलकर, नितीन अकोलकर, गजानन भेंडे, विश्वास कथे, गजानन ढाकूलकर, सुनील ढाकूलकर, अनिता ढाकूलकर, गजानन ढाकूलकर, अशोक ढाकूलकर यांच्या शेतातील कपाशी व तुरीचे नुकसान निदर्शनास आले. कपाशीची पाने निमुळती जाड व लांबट होऊन पात्या सुकल्या आहेत. तुरीच्याही पानांचा आकार कमी होऊन शेंडे सुकले आहेत, असे निरीक्षण समितीने नोंदवले.
----------------
कोट येत आहे.