मध्य प्रदेशातील मजुरांची ससेहोलपट
By admin | Published: November 4, 2015 12:17 AM2015-11-04T00:17:50+5:302015-11-04T00:17:50+5:30
स्थानिक बाजार समितीचे संत्रा मार्केटमध्ये दरवर्षी मध्य प्रदेशातून शेकडो मजूर पोटाची खळगी भरण्याकरिता मुलाबाळासह येतात.
संसार उघड्यावर : वरूडच्या संत्रा लिलाव मंडईतील प्रकार
वरुड : स्थानिक बाजार समितीचे संत्रा मार्केटमध्ये दरवर्षी मध्य प्रदेशातून शेकडो मजूर पोटाची खळगी भरण्याकरिता मुलाबाळासह येतात. यावर्षीसुध्दा शेकडो मजूर महिला, पुरुष आले आहेत. परंतु थंडीच्या दिवसांत बाजार समितीचे बाजूला वास्तव्य करतात. परंतु या मजुरांना बाजार समितीचे भकास झालेल्या खाली यार्डसुध्दा राहण्यास उपलब्ध केल्या जात नसल्याने मजूंराची चांगलीच ससेहोलपट सुरु आहे. परंतु याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
वरुड बाजार समितीच्या संत्रा मंडीच्या आवारात ४६ चे वर संत्रा मंडया आहेत. कोट्यवधी रुपयांच्या संत्र्याची खरेदी विक्री येथे होते. येथून देशाच्या कानाकोपऱ्यात संत्रा पोहोचविण्याचे काम व्यापारी करतात. दिवसागणिक ३० ते ४० ट्रक संत्रा परप्रांतीय बाजारपेठेत पाठविला जातो. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी संत्रा बाजारपेठ आहे. याकरीता मध्यप्रदेशातील खेडयापाडयातून आदीवासी मजूर मोइया प्रमाणावर येतात. यामध्ये महिला, पुरुष तसेच मुली, मुलेसुध्दा येतात. यावर्षी सुध्दा संत्रा भराईकरिता येऊन शेतावर जावून भराई करतात. रात्रीचे वास्तव्य बाजार समितीच्या सभोवताल खाली जागेत उघड्यावरच करतात. त्यांचा संपूर्ण कुटुंबच दिवसरात्र बाजार समितीच्या मागील बाजूस राहतात. परंतु बाजार समितीमध्ये मोठमोठे यार्ड रिकामे असताना यार्डाच्या छताखाली राहण्याची व्यवस्था बाजारसमितीकडून केली जात नाही. शेतकरी, शेतमजूर, हमालाच्या निवासाकरिता सुसज्ज असे निवासस्थाने असताना मजुरांना उघड्यावरच रात्र काढावी लागते. या मजुरांना कोणतीही सुरक्षा मिळत नसल्याने रात्री-बेरात्री मजुरासोबत काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून गैरप्रकार तसेच महिलांवर अत्याचार होण्याची शक्यता नागरिकांतून वर्तविण्यात येते. पोटाची खळगी भरण्याकरीता आलेल्या या मजुरांची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. बाजार समितीने धान्य ठेवण्यासाठी उभारलेले यार्ड राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, असेही बोलले जाते.
मजुरांची उघड्यावर राहुटी असून कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ससेहोलपट सुरूआहे. एकीकडे केंद्र सरकारचे ‘हेच काय अच्छे दिन’ आल्याची भाषा बोलणाऱ्या राज्यकर्त्यांना या मजुरांच्या जिवाची पर्वा नाही काय? मजुरांचा वाली कोण, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)