मजुराचे घर जळाले; संसार उघड्यावर
By admin | Published: July 12, 2017 12:12 AM2017-07-12T00:12:15+5:302017-07-12T00:12:15+5:30
नजीकच्या झिलांगपाटी येथे राजू बालू जांभेकर या मजुराचे घर जळाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.
पंचनाम्यानंतर मिळाली माहिती : पत्नी शेतात तर पती पुलाच्या कामावर
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : नजीकच्या झिलांगपाटी येथे राजू बालू जांभेकर या मजुराचे घर जळाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. घरी कुणीच नसल्याने जिवितहानी झाली नाही, मात्र आसपास कुणीच नसल्याने संपूर्ण घर बेचिराख झाल्याने मजुराचा संसार उघड्यावर आला आहे. घटनेच्या वेळी राजू कामावर, तर त्याची पत्नी मजुरीला गेल्याने त्यांना याबाबत माहिती नव्हते.
राजू जाभेकर याचे झिलांगपाटी येथे कुट्याचे घर आहे. त्याच्या घराच्या आसपाद पक्की घरे आहेत. मंगळवारी दुपारी त्याच्या घराला आग लागली. मात्र परिसरात कुणीच नसल्याने याची माहिती मिळू शकली नाही. आगीने रौद्र रुप धारण केल्यावर गावकऱ्यांनी ही माहिती ग्रामपंचायत सदस्यांना दिली. नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत संपूर्ण घर राख झाले होते. घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले. दरम्यान माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल, बीडीओ उमेश देशमुख, पं.स.चे उपसभापती जगदीश हेकळे यांनी भेट दिली. तलाठी यादव यांनी पंचनामा केला.