इर्विन रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:39 PM2018-11-13T23:39:21+5:302018-11-13T23:39:49+5:30

दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

Lack of blood in Irwin Hospital | इर्विन रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

इर्विन रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

Next
ठळक मुद्देगरजूंची रक्तासाठी धावाधाव : शिबिर आयोजनाची नितांत आवश्यकता

इंदल चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.
इर्विन रुग्णालयातील रक्तपेढीतून जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो तसेच जिल्ह्यातील आठ ब्लड स्टोअरेजमध्येही रक्तपुरवठा केला जातो. यासाठी जिल्ह्यातील विविध भागातील महाविद्यालये, सामाजिक संघटनांद्वारे आयोजित रक्तदान शिबिरांमार्फत रक्त संकलन केले जातात.
सध्या दिवाळीच्या सुट्या आल्याने सामाजिक संघटना इतर कामात व्यस्त, तर विद्यार्थ्यांना सुट्या असल्याने ते बाहेरगावी गेल्यामुळे शिबिरे झालेली नाहीत. त्यामुळे इर्विन रक्तपेढीत रक्त संकलन प्रक्रिया थांबल्यामुळे विविध ग्रुपच्या रक्ताची आवश्यकता भासत आहे. परिणामी सिकलसेल, हिमोफिलिया, थॅलेसिमियाचे रुग्णांना रक्तपुरवठा करणे कठीण जात आहे तसेच रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांची इतरत्र धावाधाव सुरू आहे.
दिवाळी भेट म्हणून रक्तदान करण्याची संकल्पना राबविल्यास ती अमरावतीकरांसाठी सुंदर उपक्रम ठरू शकतो. याबाबत विद्यार्थी, युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. हल्ली रक्तदान शिबिरे घेण्याची नितांत गरज असल्याचे इर्विन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर म्हणाले.
आठ ब्लड स्टोअरेजमध्ये रक्तपुरवठा
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचाराकरिता येणाºया रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास ते जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत तसेच दुर्गम भागात वेळीच रक्तपुरवठा व्हावा, या उद्देशाने इर्विनच्या रक्तपेढीमार्फत जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, चुरणी, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अचलपूर व डफरीन रुग्णालयात रक्तपुरवठा केला जातो.
एबी, बी पॉझिटिव्ह रक्त मिळणे दुरापास्त
सध्या रक्तपेढीत प्रत्येक ग्रुपमध्ये सात ते आठ बॅग रक्त जमा असून, एबी आणि बी पॉझिटिव्ही रक्त उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ग्रुपच्या रुग्णांना रक्त मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहे.

दिवाळीची भेट देण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे, त्याचप्रमाणे रुग्णांच्या वाढच्या गरजेनुसार नागरिकांनी रक्तदान शिबिर घेऊन जीवनज्योती योजनेप्रमाणे गरजू रुग्णांना दिवाळी भेट द्यायला हवी.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Lack of blood in Irwin Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.