आर्द्रतेचा अभाव, तूर वांझोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:25 AM2018-01-05T01:25:41+5:302018-01-05T01:26:13+5:30

यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे, अशा भागात पिकांची वाढ खुंटून तुरीला शेंगा पकडल्या नाहीत, असा अहवाल कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञासह कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यात भेटी दरम्यान दिला.

Lack of humidity, frustration of poison | आर्द्रतेचा अभाव, तूर वांझोटी

आर्द्रतेचा अभाव, तूर वांझोटी

Next
ठळक मुद्देकृषी विद्यापीठ पथकाचा अहवाल : सरासरीपेक्षा कमी पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे, अशा भागात पिकांची वाढ खुंटून तुरीला शेंगा पकडल्या नाहीत, असा अहवाल कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञासह कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यात भेटी दरम्यान दिला.
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीसह काही तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले. या ठिकाणी तूर जागीच वाळत असून, शेंगादेखील धरल्या नाहीत, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्यात. या भागात क्षेत्रभेटी देण्यासाठी कृषी विद्यापीठाला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील प्रादेशिक अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ व विस्तार कृषी विद्याव्यक्ता हेमंत डिके, वनस्पतिरोग शास्त्रज्ञ धीरज वसुले यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाºयांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव, चिंचोली व सातेगाव आदी ठिकाणी भेटी दिल्यात.
सर्व शेतकºयांनी जुलैच्या तिसºया आठवड्यात मारोती या वाणाची पेरणी केलेली आहे. सद्यस्थितीत या पिकाची वाढ खुंटलेली आहे. या ठिकाणी सरासरीच्या केवळ ४० टक्केच पाऊस झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. कमी पावसामुळे तुरीच्या फुलोराचे रूपांतर शेंगांमध्ये झालेले नाही जमीनीत पुरेशी आर्द्रता नसल्यामुळेच. शेंगा धरल्या नसल्याचा निष्कर्ष या पथकाने काढला. या स्थितीमुळे खरिपातील अंतिम पिकातही तोटा आल्याने शेतकºयांची स्थिती शोचनीय झाली आहे.
पाच तालुक्यांतील तूर दवाळबाधित
जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात कमी पावासाने तूर वांझोटी राहिली, तर अमरावती, भातकुली, चांदूरबाजार, मोर्शी व अचलपूर तालुक्यात अतिथंडीमुळे शेंगा भरलेली तूर जागच्या जागी सुकायला लागली आहे. तुरीवर दवाळ गेल्यामुळे अशी स्थिती ओढावली असल्याचे कृषी विभागाने सांगितले. या बाधित तूर पिकांचे शासनाने सर्वेक्षण करून नैसर्गिक आपत्तीची मदत शासनाने द्यावी, अशी मागणी आहे.

Web Title: Lack of humidity, frustration of poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.