पुनर्वसन व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडला वासनी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:17 AM2021-08-13T04:17:05+5:302021-08-13T04:17:05+5:30
अचलपूर तालुक्यातील हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. पूर्वी पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी हा प्रकल्प रखडला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी ...
अचलपूर तालुक्यातील हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. पूर्वी पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी हा प्रकल्प रखडला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. मान्यतेचा खोडा दूर झाला असला तरीही प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तीन गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. पुनर्वसनामध्ये बोरगाव दोरी, बोरगाव तळणी या गावांचे पूर्णत:, तर बोरगावाचे अंशत: पुनर्वसन अद्याप झालेले नाही. या प्रकल्पाला २००७ मध्ये जेव्हा मान्यता मिळाली तेव्हा हा प्रकल्प १०२ कोटींचा होता. आता या प्रकल्पाला ८२६ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. प्रकल्पावर आतापर्यंत ५९० कोटींचा खर्च झाला आहे.
प्रकल्पाची घळभरणी झाल्यास जून २०२३ मध्ये चार हजार हेक्टरचे, तर जून २०२४ मध्ये १८०४ हेक्टरमध्ये सिंचनक्षमता निर्मितीचे नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. पण, कोरोनामुळे या प्रकल्पाचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी विचारत आहेत.
कोट
दोन गावांचे पुर्ण तर एका गावाचे अंशता: पुनर्वसन झाले नाही. प्रयत्न सुरु आहेत. प्रकल्पाला नव्याने ८२६ कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.
- सुरेंद्र आडे, कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग