जिल्ह्यात तीन हजार लीटरने घटली दुधाची आवक

By Admin | Published: January 17, 2017 12:01 AM2017-01-17T00:01:22+5:302017-01-17T00:01:22+5:30

दुग्ध व्यावसायिकांनी शासकीय दूध विकास केंद्राकडे पाठ फिरविल्यामुळे जानेवारी महिन्यात शहरात शासकीय दुधाची आवक घटल्याचे चित्र आहे.

Lack of three thousand liters of milk in the district | जिल्ह्यात तीन हजार लीटरने घटली दुधाची आवक

जिल्ह्यात तीन हजार लीटरने घटली दुधाची आवक

googlenewsNext

शासकीय संकलन केंद्राकडे उत्पादकांची पाठ
संदीप मानकर अमरावती
दुग्ध व्यावसायिकांनी शासकीय दूध विकास केंद्राकडे पाठ फिरविल्यामुळे जानेवारी महिन्यात शहरात शासकीय दुधाची आवक घटल्याचे चित्र आहे. पूर्वी १२ ते १५ हजार लीटर दुधाची आवक होती. सद्यस्थितीत ती ७ ते ९ हजार लीटरवर आली आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून दूध उत्पादन घटल्याने अनेक नोंदणीकृत दुग्ध संकलन संस्था अवसायनात निघाल्या असून काही संस्था बंद पडल्या आहेत. सद्यस्थितीत सात ते नऊ हजार लीटर दुधाची आवक या शासकीय दुग्धविकास केंद्रांमध्ये सुरू आहे. ५७ सहकारी संस्थांमधून दूध संकलन होत आहे. दुग्ध उत्पादन करणाऱ्या संस्थांना शासकीय दुग्ध विकास केंद्राद्वारे वाजवी दर मिळत नसल्याने हे दूध उत्पादक खासगी दूध डेअरींना दुधाची विक्री करतात. खासगी दूध डेअरींमध्ये दुधाला अधिक दर मिळत असल्याने दूध उत्पादकांचा कल त्याकडे वाढतो आहे.
वास्तविक डिसेंबर महिन्यात शहरात दुधाची आवक वाढली होती. परंतु वातावरण बदलामुळे जानेवारीत दुधाची आवक घटल्याची माहिती शासकीय यंत्रणेने दिली. शासकीय दूध संकलन केंद्रात दररोज २४०० ते २५०० लिटर ‘टोन्ड मिल्क’ तयार होते. एकूण ५२६ प्राथमिक नोंदणीकृत दूध उत्पादक संस्था असून त्यापैकी ४४९ संस्था अवसायनात निघाल्या असून तूर्तास ५७ संस्था सुुस्थितीत सुरू आहेत, तर १७ ते १९ संस्था दूध संकलनाअभावी पूर्णपणे बंद पडल्या आहेत.
अमरावती येथील शासकीय दूध संकलन केंद्रात यवतमाळ येथून दररोज दुधाचा टँकर येतो. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही दुधाचे संकलन केले जाते. या संकलित दुधावर प्रक्रिया करून शासनाच्या ‘आरे ब्रँड’ची पाकिटे तयार केली जातात व व्यावसायिकांना विक्रीसाठी वितरित केली जातात. दूध डेअरींमधून या दुधाची नागरिकांना ४० ते ५० रूपये प्रती लीटरनुसार विक्री केली जाते. नोंदणीकृत दूध उत्पादक सहकारी संस्थांद्वारे शासकीय संकलन केंद्राला दुधाची विक्री केली जात असली तरी त्यांना अत्यल्प दर मिळतो. ३.०५ फॅ ट व ८.५ एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) साठी २४.५० पैसे प्रतीलीटर, तर ६.० फॅट व ९.० एसएनएफच्या प्रमाणासाठी ३१.५० पैसे इतका दर दिला जातो. हा दर बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने तो परवडत नसल्याचे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. परिणामी प्रतीलिटर ५ ते १० रूपये अधिक दराने ्नखासगी दूध डेअरींना दूध देण्याकडे कल वाढला आहे, ही स्थिती फारशी समाधानकारक नाही.

५७ नोंदणीकृत प्राथमिक दुग्ध उत्पादन संस्था सुरू आहेत. त्यापैकी ५७ संस्थाच संघाला दूध पुरवितात. तीन ते चार वर्षांच्या तुलनेत तीन हजार लीटरनी दुधाची आवक घटली आहे. त्याला अनेक कारणे आहेत.
- एस.बी.जांभुळे,
दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, अमरावती

Web Title: Lack of three thousand liters of milk in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.