लाडाची लेक सीमेवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:03+5:302021-08-22T04:16:03+5:30

अमरावती : चीन, रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्राईल आणि युनायटेड स्टेट्स, भारत अशा मोजक्याच देशांत सैन्यामध्ये मुलींना स्थान ...

Lada's Lake will fight on the border! | लाडाची लेक सीमेवर लढणार !

लाडाची लेक सीमेवर लढणार !

Next

अमरावती : चीन, रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्राईल आणि युनायटेड स्टेट्स, भारत अशा मोजक्याच देशांत सैन्यामध्ये मुलींना स्थान प्राप्त झाले आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा देण्याची संधी मिळाली असून, त्यांना थेट सीमेवर लढता येणार आहे.

देशाच्या लष्करात हल्ली वैद्यकीय, कायदेशीर, शैक्षणिक, सिग्नल आणि अभियांत्रिकी शाखांसारख्या निवडक क्षेत्रांत महिलांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सैन्यात महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसारखीच संधी, लाभ मिळतील. ज्यात पद, पदोन्नती आणि निवृत्तिवेतन यांचा समावेश असेल आणि त्यांना अधिक काळ सेवा देण्याची परवानगी दिली जाईल, सध्या महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्धारे समाविष्ट केले जाते, जे त्यांना १४ वर्षांपर्यंत काम करू देते आणि केवळ सैन्याच्या कायदेशीर आणि शैक्षणिक शाखांमध्ये कायमस्वरूपी कमिशनची परवानगी देण्यात आली आहे.

--------------

लष्करात प्रवेशासाठी....

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मुलींना सैन्यात भरती होऊन गरुडझेप घेण्यासाठीचे दरवाजे खुले केले आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए, आयएमए आणि ओटीए अशा तीन माध्यमांद्धारे लष्करात प्रवेश करता येणार आहे. महिला लष्करी कमांडर म्हणून काम करू शकतात, हे आता सर्वेाच्च न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट केले आहे.

------------------------

काय आहे सर्वेाच्च न्यायालयाचा निकाल?

१) स्वतंत्र भारतात १९५८ पासून मुलींना सैन्यात भरती होण्यासाठीचा कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र, सैन्यात मुलींना सीमेवर लढण्यासाठी पाठविले जात नाही. मात्र, सर्वेाच्च न्यायालयाने लिंगाच्या आधारावर त्यांच्या क्षमतेवर आशंका घेणे हे केवळ महिला म्हणून त्यांच्या सन्मानालाच नव्हे तर भारतीय लष्कराच्या सदस्यांच्या मानसिकदृष्ट्या शिकविले गेले नव्हते, अशी टीका केली आहे.

२) पारंपरिक पुरुषांच्या बुरुजामध्ये लिंगसमानतेच्या दिशेने वाटचाल दर्शविणाऱ्या सर्व महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा, जी आतापर्यंत फक्त पुरुषांना लागू आहे, ती वाढविण्याचे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने दिले.

-----------------------

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार !

‘मुलीसुद्धा मुलांपेक्षा कमी नाहीत, हे अनेकदा पुढे आले आहे. आता तर सर्वेाच्च न्यायालयाने लष्करात भरती होऊन थेट सीमेवर लढण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली आहे. देशसेवेचे हे मोठे कार्य असेल.’

- मृदुला आडे, एनसीसी

-------------

भारतीय राज्यघटनेचा पाया हा समानतेवर आधारित आहे. त्यामुळे लष्करात महिलांना समान संधी देण्याचा निर्णय योग्य आहे. भविष्यात या निर्णयामुळे अनेक मुली संधीचे सोने करतील आणि देशासाठी कर्तव्य बजावतील.

- भक्ती देशमुख, एनसीसी

-----------

सैन्यात समानता आणण्यासाठी सर्वेाच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय चांगला ठरणारा आहे. आता महिलांना लढाऊ भूमिकांमध्ये तैनात करण्यात येणार आहे. एनसीसी हे लष्करात करिअर करण्यासाठीचे प्लॅटफाॅर्म ठरेल.

- लावण्या सावरकर, एनसीसी

--------------------

शहरात एनसीसीच्या ३८० मुली

अमरावती शहरातील इयत्ता आठवी व नववीच्या ३८० मुली एनसीसीमध्ये सामील असल्याची नोंद एनसीसी भवनात असल्याची माहिती आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे एनसीसी परेड, सराव, आदी बाबी बंद असल्या तरी देशाभिमान बाळगणाऱ्या मुलींनी एनसीसी कॅडेट कोअरमध्ये प्रवेश केला आहे.

Web Title: Lada's Lake will fight on the border!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.