पायाभरणीसाठी ‘लाखाची’ मदत

By admin | Published: April 10, 2016 12:05 AM2016-04-10T00:05:56+5:302016-04-10T00:05:56+5:30

निम्नपेढी प्रकल्पग्रस्त अळणगाव व कुंड (खुर्द) येथील कुटुंबांना पुनर्वसनस्थळी घराच्या पायाभरणीसाठी प्रती कुटुंब एक लाख रुपये मिळणार आहेत.

'Lakhchi' help for funding | पायाभरणीसाठी ‘लाखाची’ मदत

पायाभरणीसाठी ‘लाखाची’ मदत

Next

प्रकल्पग्रस्तांना दिलासा : ९०० कुटुंबांना लाभ
अमरावती : निम्नपेढी प्रकल्पग्रस्त अळणगाव व कुंड (खुर्द) येथील कुटुंबांना पुनर्वसनस्थळी घराच्या पायाभरणीसाठी प्रती कुटुंब एक लाख रुपये मिळणार आहेत. उभय गावांचे पुनर्वसन कठोरा शिवारात होणार आहे; तथापि या भागात काळी माती असल्याने ‘जोता’ बांधण्यासाठीच लक्षावधीचा खर्च येणार आहे.
प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मूळ घराचा मोबदला मिळाल्यानंतर उभय गावांचे पुनर्वसन गावठानात स्थलांतर होणार आहे. उभय गावांतील कुटुंबांसाठी येथे भूखंड पाडण्यात आले आहेत. तथापि, घराचे बांधकाम करण्यापूर्वी पायाभरणीचा खर्च अधिक असल्याने हा खर्च शासनाने द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. यासाठी स्थानिक आमदार सुनील देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश येऊन आता पेढी प्रकल्पबाधित प्रत्येक कुटुंबाला घराच्या पायाभरणीसाठी १ लाख रुपये मिळतील. यासाठी अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सु. गो. राठी यांनी प्रयत्न केले. या मदतीमुळे प्रकल्पग्रस्तांचे घरबांधणीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या अनुषंगाने शनिवारी आ. देशमुख यांनी पुनर्वसन स्थळ गाठून मुलभूत सुविधांची पाहणी केली तथा अधिकाऱ्यांना योग्य ते दिशानिर्देश दिले. अळणगावचे सतीश मेटांगे व अन्य ग्रामस्थांनी यावेळी देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी प्रकल्प बांधकाम विभागाचे सु. गो. राठी, नगरसेवक प्रदीप दंदे, माजी महापौर विलास काशीकर आणि उभय गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
अळणगाव आणि कुंड खुर्द येथील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कठोरा ते रेवसा या मार्गावरील शेतात आहे. याठिकाणी प्रचंड बाभूळबन झाले होते. शनिवारच्या कार्यक्रमापूर्वी अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने पुनर्वसन स्थळावरील बाभूळबन जेसीबीने काढून टाकले.
याठिकाणी आता जायचा मार्ग प्रशस्त बनला आहे. याशिवाय पुनर्वसित ग्रामस्थांना घरे बांधण्यासाठी पाण्याची सोय असल्याने व आज प्रथमच या ठिकाणी सामूहिक भोजन झाल्याने ग्रामस्थांनी जल्लोष केला. पुनर्वसन विभागाने अळणगाव येथील ग्रामस्थांना फक्त भूखंडाचे वाटप केले आहे. मात्र प्रत्यक्षात आपला भूखंड कुठे आहे? याबाबत सारेच अनभिज्ञ आहेत. (प्रतिनिधी)

प्र्रकल्पग्रस्तांनो, आता पटकन या!
अळणगाव आणि कुंड खुर्द येथील पुनर्वसित कुटुंबांना कठोरा पुनर्वसन स्थळी घरे बांधण्यापूर्वी पायाभरणीसाठी प्रतिकुटुंब एक लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी आ. सुनील देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. त्यानिमित्ताने कठोरा पुनर्वसनस्थळी देशमुखा यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनो, आता त्वरित पुनर्वसनस्थळी घरे बांधायला सुरुवात करा, गावाच्या मोहातून बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले. याखेरीज पुनर्वसनातील अन्य मूलभूत सुविधा विनाविलंब करण्याच्या सूचना उपस्थित अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाला दिल्यात. हे महाराष्ट्रातील आदर्श पुनर्वसन होईल, असे काम करून दाखवा, अशी साद देशमुखांनी घातली.

Web Title: 'Lakhchi' help for funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.