परीक्षेपूर्वीच एमपीएससी परीक्षाचे लाखों हॉल तिकीट लिक; अमरावतीच्या विद्यार्थ्यांची आयोगाकडे तक्रार

By गणेश वासनिक | Published: April 23, 2023 02:40 PM2023-04-23T14:40:20+5:302023-04-23T14:40:34+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहे तर अमरावतीच्या एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी चेतन जायदे याने राज्यसेवा आयोगाकडे याची तक्रार केली आहे.

Lakhs of MPSC Exam Hall Tickets Leaked Even Before Exams; Complaint of Amravati students to the commission | परीक्षेपूर्वीच एमपीएससी परीक्षाचे लाखों हॉल तिकीट लिक; अमरावतीच्या विद्यार्थ्यांची आयोगाकडे तक्रार

परीक्षेपूर्वीच एमपीएससी परीक्षाचे लाखों हॉल तिकीट लिक; अमरावतीच्या विद्यार्थ्यांची आयोगाकडे तक्रार

googlenewsNext

अमरावती :  येत्या ३० एप्रिल रोजी  एमपीएससीची परीक्षा होणार आहे. दरम्यान परीक्षेच्या आधीच लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाले आहे त्यामुळे एकाच खळबळ उडाली असून यात गोपनीयता भंग झाल्याचा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहे तर अमरावतीच्या एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी चेतन जायदे याने राज्यसेवा आयोगाकडे याची तक्रार केली आहे. आमची गोपनीय माहिती एमपीएससीकडून परीक्षेच्या आधीच लिक झाली असल्याचा या विद्यार्थ्याने केला आहे. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. 

३० एप्रिलचा जो पेपर आहे तो देखील MPSC २०२३ A या टेलीग्राम चैनल कडे उपलब्ध असल्याचा धक्कादायक आरोप विद्यार्थ्यांने केला आहे. तर ही बाब लक्षात घेऊन त्वरित यावर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे असून आयोगाला आणि सरकारला विनंती केली आहे. या प्रकाराबाबत गोंधळ होऊ शकते.  याची दखल घेऊन आयोगाने कारवाई केली पाहिजे. कारण हॉल तिकीट फक्त ते विद्यार्थ्यांनाच मिळवता येते अशी मागणी विद्यार्थीने केली आहे.
 

Web Title: Lakhs of MPSC Exam Hall Tickets Leaked Even Before Exams; Complaint of Amravati students to the commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.