आंध्र प्रदेशातील ‘लक्ष्मी’ अमरावतीत

By admin | Published: November 2, 2015 12:33 AM2015-11-02T00:33:29+5:302015-11-02T00:33:29+5:30

हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. घराला रंगरंगोटी, फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी,

In Lakshmi, Amrapati in Andhra Pradesh | आंध्र प्रदेशातील ‘लक्ष्मी’ अमरावतीत

आंध्र प्रदेशातील ‘लक्ष्मी’ अमरावतीत

Next

कुटुंबीयांसह दाखल : दीपोत्सव ‘कॅश’ करणार
अमरावती : हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. घराला रंगरंगोटी, फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी, आकर्षक दिवे-पणत्या लावून हा सण साजरा केला जातोे. दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा दिवस असून, या दिवशी घरात लक्ष्मीचा वास असावा म्हणून झाडू-झाडणीची पूजा केली जाते. यंदा आंध्र प्रदेशातील काही कुटुंबीय अमरावतीत दाखल झाले आहेत. दीपोत्सव ‘कॅश’ करण्यासाठी ‘लक्ष्मी’ची विक्री करताना दिसून येत आहेत.
दिवाळी हा आनंद आणि उत्सवाची पर्वणी. फटाकेल नवीन कपडे, आणि गोडधोड फराळ यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो. दिवाळीची चाहूल लागताच घराच्या साफसफाई, रंगरंगोटीला सुरुवात होते. दीपावलीत प्रत्येक दिवस महत्वाचे वेगळे असून, लक्ष्मीपूजनाला झाडणीची पूजा करण्याची परंपरा आहे. केरसूणी (झाडणी) ही घर स्वच्छ ठेवणारी, घरातील लक्ष्मी म्हणून मान आहे. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार मागे पडल्याने आता पारंपरिक व्यवसाय लोप पावू लागले आहेत. पूर्वी विशेष करुन मातंग समाजाचे लोक केरसूणी तयात करीत होते. मात्र झाडणी तयार करण्यासाठी सिंदीची झाडे मिळत नसल्याने पारंपरिक व्यवसायावर अवकळा आली आहे. परिणामी आंध्रप्रदेशातील सुमारे १२ ते १५ कुटुंब लाखो झाडण्या घेऊन शहरात दाखल झाले आहे. खजुराचा पानापासून या झाडण्या तयार केल्या जातात. लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारांत तयार करण्यात येणाऱ्या या झाडण्यांची किंमत१५ ते २० रुपये इतकी आहे. एरवी ही मंडळी शेतमजुरी, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. मात्र दिवाळीच्या मोसमात महाराष्ट्रात चांगला व्यवसाय असल्याने ते झाडणी बनविण्याचा आपला पांरपरिक व्यवसाय करतात. राज्यातील प्रमुख शहरात आंध्रप्रदेशातील झाडणी विक्री करणारे दाखल झाले आहेत. दिवाळीचा उत्सव कॅश केल्यानंतर ते आपल्या मूळ गावी परतात हा दरवर्षीचा शिरस्ता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In Lakshmi, Amrapati in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.