तीन तासांच्या चार्जिंगवर ३०० किमी धावणार लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:46+5:302021-09-02T04:26:46+5:30
५० गाड्यांचे नियोजन; आठ आगारांना मिळणार बस अमरावती : राज्य परिवहन महामंडळाकडून अमरावती विभागाला वीजेवर धावणाऱ्या ५० इलेक्ट्रिकल ...
५० गाड्यांचे नियोजन; आठ आगारांना मिळणार बस
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाकडून अमरावती विभागाला वीजेवर धावणाऱ्या ५० इलेक्ट्रिकल बसेस मिळणार आहे.यामुळे इंधन खर्चात बचत होणार असून तीन तासांच्या चार्जिंगवर तीनशे किलाेमिटर धावणाऱ्या या बसेस लवकरच महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
अमरावती विभागातील अमरावती,बडनेरा,दर्यापूर,परतवाडा,चांदूर बाजार,मोर्शी,वरूड,चांदूर रेल्वे अशा आठ एसटी आगारांना ५० इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बॉक्स
५० बसेस ताफ्यात होणार दाखल
राज्य परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिवर बसेस चालविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.त्याअनुषंगाने जिल्ह्याला ५० बसेस मिळण्याची शक्यता आहे.याकरीता स्थानिक विभाग नियंत्रक यांचेकडून महामंडळाने माहिती मागविली आहे.ही माहिती संकलनाचे काम सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बॉक्स
मध्यम पल्यावर धावणार बसेस
अमरावती - यवतमाळ,अमरावती - परतवाडा,परतवाडा- अमरावती,दयार्पूर - अमरावती,अमरावती -अकोट,परताडा ते अकोला,वरूड- नागपूर,अमरावती - वर्धा,अमरावती- वरूड,अमरावती चांदूर बाजार आदी मार्गावर या बसेस धावणार आहेत.
बॉक्स
८ आगारात चार्जिंग स्टेशन !
वीजेवर चालणाऱ्या एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर खर्चात बचत होणार आहे.तीन तासांच्या चार्जिंगवर या बसेस धावणार आहेत.बसचे चार्चिंग करण्यासाठी जिल्ह्यातील आठ आगारात चार्चिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे.
कोट
वरिष्ठ स्तरावरून इलेक्ट्रिक बसेस बाबत विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे.यासंदर्भात माहिती संकलित करून सादर केली आहे. आता पुढील कारवाई वरिष्ठ स्तरावर प्राप्त सूचनेनुसार केली जाईल.
श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक
अमरावती