बंधाऱ्यावरील साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:09+5:302021-05-28T04:11:09+5:30

अमरावती : नांदगाव पेठ ते शेवती जहागीर मार्गावरील कोल्हापुरी बंधाऱ्यानजीक ४२ लोखंडी निडल्स चोराने लंपास केले. ही घटना बुधवारी ...

Lampas on the embankment material | बंधाऱ्यावरील साहित्य लंपास

बंधाऱ्यावरील साहित्य लंपास

Next

अमरावती : नांदगाव पेठ ते शेवती जहागीर मार्गावरील कोल्हापुरी बंधाऱ्यानजीक ४२ लोखंडी निडल्स चोराने लंपास केले. ही घटना बुधवारी उघडकीस आली. बंधाऱ्यातील लोखंडी निडल्स काढून बाजुला ठेवण्यात आले होते. दरम्यान जलसंधारण अधिकारी आनंद श्रीपाद शेंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना ही बाब निदर्शनास आली. घटनेची तक्रार जिल्हा परिषदेचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी अनिल रामदास मोवाळे यांनी नांदगाव पेठ पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अनवर खा ऊर्फ अन्नु (रा. काळा मारोती, नांदगाव पेठ) याचेविरुध्द गुन्हा नोंदविला.

000000000000000000000000

फरशी स्टॉपवरून दुचाकी लंपास

अमरावती : फरशी स्टॉप स्थित स्टेट बॅकेसमोरून एका वृध्द व्यक्तीची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. शरदचंद्र परशराम केळकर (७९ रा. संतोषीनगर) हे बॅकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एमएच २७-३९६६ या क्रमांकाची लुना बॅकेसमोर उभी केली होती. त्यानंतर ते बॅकेच्या रांगेत उभे होते. दरम्यान चोराने त्यांची लुना चोरून नेली. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.

000000000000000000000

राजापेठ परिसरात महिलेचा विनयभंग

अमरावती : राजापेठ परिसरातील झेंडा चौकात एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी योगेश दिपक बुजरे (३२ रा राजापेठ) याचेविरुध्द गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पीएसआय आरती गवई यांनी केला.

0000000000000000000000000000000000000

त्या मद्यपी व्हॅनचालकाविरुध्द गुन्हा

अमरावती : रुग्णवाहिकेला धडक देणाऱ्या मद्यपी व्हॅनचालकाविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला. विठ्ठल भैय्यालाल बावणे (36 रा. चुर्णी, ता. चिखलदरा) हे एमएच २७ बीएक्स ५४६५ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने डफरीने रुग्णालयात येत असताना, त्यांच्या वाहनाला सांस्कृतीक भवनासमोर मारोती व्हॅन क्रमांक एमएच २७ एसी ६४३० ने धडक दिली होती. या घटनेची तक्रार विठ्ठल बावणे यांनी गाडगेनगर पोलिसात नोंदविली होती.

Web Title: Lampas on the embankment material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.