घरातून ४५ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:07+5:302021-09-15T04:17:07+5:30
अंगणात उभी केलेली दुचाकी लंपास वरूड : अंगणात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी पहाटे ...
अंगणात उभी केलेली दुचाकी लंपास
वरूड : अंगणात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी पहाटे शिवाजीनगरात उघडकीस आली. विंद्र वसंतराव कुबळे (रा. वरूड) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी एमएच २७ के ३८६२ क्रमांकाची दुचाकी घराच्या अंगणात उभी केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पाहिले असता, ती दिसली नाही. तक्रारीवरून वरीड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------
मेळघाटच्या राजाचे थाटात आगमन (फोटो इंदलकडे)
धारणी : आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांचे चिरंजीव रोहित पटेल यांच्या देखरेखीत महात्मा फुले रंगभवण मैदानावर मेळघाटच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृषभ गाडगे आणि त्यांच्या चमूद्वारे परिश्रम घेण्यात येत आहे. उत्कृष्ट साज लाईफ टेन्ट हाऊस उभारण्यात आले आहे. या मंडळाची दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे.
----------------
कार अपघातातील त्या महिलेचा मृत्यू
परतवाडा : भरधाव कार वळण रस्त्यावर पलटी झाल्याने त्यातील महिलेचा उपचारा दरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. ही घटना १ महिव्यापूर्वी वडगाव फत्तेपूरनजीक पुलावर घडली. मधुरा रनसिंग चव्हाण (३७) असे मृत महिलेचे नाव आहे. परतवाडा पोलिसांनी कार क्रमांक एमएच ४० सी १२३३ चा चालक इरफान खान वल्द जहीर खान (रा. जुनी वस्ती बडनेरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------
मंगल कार्यालयासमोरू दुचाकी लंपास
चांदूर रेल्वे : शहरातील एका मंगल कार्यालयाच्या गेटसमोर उभी केलेली दुचाकी लंपास करण्यात आली. ही ११ सप्टेंबर रोजी घडली. अमोल रवींद्र लोहारे (३२, रा. चांदूर रेल्वे) यांच्या तक्रारीवरून चांदूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ
तिवसा : सासरकडून मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार २१ वर्षीय विवाहितेकडून तिवसा पोलिसांना प्राप्त झाली. त्यावरून पोलिसांनी आरो. कल्पेश गौतम काळबांडे, गौतम डोमाजी काळबांडे, पंकड गाडगे, अमर डोंगरे व दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.