घरातून ४४ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:46+5:302021-09-06T04:16:46+5:30

क्षुल्लक कारणावरून पत्नीवर पावशीने वार कुऱ्हा : मद्यपी पतीने क्षुल्लक कारणावरून पावशीने मारून जखमी केल्याची घटना ढाकुलगाव येथे ३१ ...

Lampas stole Rs 44,000 from home | घरातून ४४ हजारांचा ऐवज लंपास

घरातून ४४ हजारांचा ऐवज लंपास

Next

क्षुल्लक कारणावरून पत्नीवर पावशीने वार

कुऱ्हा : मद्यपी पतीने क्षुल्लक कारणावरून पावशीने मारून जखमी केल्याची घटना ढाकुलगाव येथे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी आरोपी जगदीश मारोती डवरे (४५) विरुद्ध गुन्हा नोंदविला. भाजी चांगली केली नसल्याच्या कारणावरून हा वाद झाला.

-----------------

युवकाच्या खांद्याला घेतला चावा

खल्लार : पैसे दिले की नाही, असे म्हणून युवकाच्या गालावर थापड मारून डाव्या खांद्याला चावा घेतल्याची घटना खल्लार पोलीस ठाण्यांतर्गत रामपुरा अंजनगाव परिसरात ३ सप्टेंबर रोजी दुकारी अडीचच्या सुमारास पानटपरीवर घडली. अक्षय काळे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेजस संजय तडोकार (२२, रा. रामपुरा, अंजनगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अंजनगाव सुर्जी : भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी दिनेश सुधाकर रुचके यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील सुधाकर रुचके हे ४ सप्टेंबर रोजी कार्यालयीन काम आटपून घरी येताना हसनापूर फाट्यावर चारचाकी वाहन एमएच २७ ए झेड ५२२७ च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकी क्रमांक एमएड २७ सीजी ७२४७ ला जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------

खरेदी करताना ५ हजार रुपये लांबविले

अंजनगाव सुर्जी : दुकानात खरेदी करीत असताना अज्ञाताने पर्समधील ५ हजार रुपये लांबविल्याची घटना चावळी चौकात ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Lampas stole Rs 44,000 from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.